दररोज हजार वाटसरूंना अन्नदान; सर्व गावांनी घ्यावा पिंपरी कलगाचा आदर्श !

Smiley face < 1 min

ई-ग्राम नेर : आज जवळ-जवळ लॉकडाऊन होऊन ५२ दिवस झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व कामधंदे बंद पडल्यामुळे उपाशी तपाशी मजूर आपल्या मायभुमीकडे हजारो किलोमीटर वाट तुडवत तप्त उन्हाच्या झळा सोसत अनवाणी पायांनी निघाले आहेत. मिळेल ते वाहन किंवा पायदळ आपले गाव गाठणाच्या इराद्याने ते चालत आहेत.

अन्न पाण्याविना चालत असलेल्या या जिवंत माणसांची वेदना पाहून नेर तालुक्यातील पिंपरी कलगा येथील होतकरू तरुणांच्या मनातील संवेदना जागृत झाली. पाहता पाहता अख्खे गाव या तरुणांच्या मदतीला धाऊन आले. दररोज हजारो वाटसरुंच्या पोटाची आग शांत केली जात आहे. गावातील प्रत्येक साधारण व गरीब कुटुंबातून गहू तांदूळ भरा-भर जमा झाले यासाठी काम करणाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

गावातील काही तरुणांनी गावाच्या दोन्ही बाजूने ५० किलोमीटर लांब पर्यंत जात ‘आमच्या गावात मोफत अन्न मिळत आहे’. असे फलक लावले आणि मोबाईल नंबरही दिला. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या प्रत्येक भुकेल्यांची भूक भागविण्याचे आणि तेवढेच पुण्याचे काम पिंपरी कलगा येथील होतकरू तरुण करीत आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App