कृषी क्षेत्राला तात्काळ १ लाख कोटींचं पॅकेज

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधून कृषी क्षेत्राशी संबंधित घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. कृषी क्षेत्राशी घटकांसाठी केंद्र सरकार तात्काळ १ लाख कोटी रुपयांची तरतूद करत असल्याचा निर्णय सीतारामन यांनी जाहीर केला.

१ लाख कोटींचा निधी कोल्ड चेन्स, पीक काढणी पश्च्यात व्यवस्थापन साधनसुविधांसाठी शेतकरी उत्पादक संघटना, प्राथमिक कृषी सहकारी सोसायट्या यांच्यासाठी उपलब्ध केला जात आहे. भारत सर्वात मोठा दूध, ज्यूट उत्पादक आणि डाळींचे उत्पादन करणारा देश आहे. ऊस, कापूस, शेंगदाणे, फळे, भाज्या, मत्स्यउत्पादनात देशाचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या क्रमांकाचा तृणधान्य उत्पादक देश आहे, भारतीय शेतकऱ्यानं मोठे परिश्रम केले आहेत आणि आपल्याला सर्वाधिक उत्पादन मिळवून देईल याची काळजी घेतली आहे, असे सीतारामन यांनी म्हटले.

लॉकडाऊन दरम्यान शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची आठवण अर्थमंत्री सीतारामन यांनी करून दिली. ७४,३०० कोटी रुपयांची लॉकडाऊन दरम्यान किमान आधारभूत किंमतीत खरेदी केली. १८,७०० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले. ६४०० कोटी रुपये पीएम पीकविमा योजनेअंतर्गत दिल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App