अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा

Smiley face < 1 min

पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोरोना साथीचा संसर्ग रोखण्याकरिता विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तथापि, या कालावधीमध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा याकरिता  प्रशासनाकडून विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी नियोजन करण्यात आले आहे. याचाच भाग म्हणजे आतापर्यंत विभागामध्ये जीवनावश्यक वस्तू म्हणजेच अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा पुरेसा साठा उपलब्ध होत आहे.

वाचा:  ३० जूनपर्यत देऊळ बंद; विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचा निर्णय

या जीवनावश्यक वस्तूंच्या साठ्याबाबत व दररोज किती प्रमाणात आवक होत आहे याबाबतचा आढावा दररोज घेण्यात येतो. यामध्ये पुणे येथील मार्केटमध्ये विभागात ४८ हजार ६०४ क्विंटल अन्नधान्याची सरासरी आवक असून भाजीपाल्याची सरासरी आवक ९ हजार ९५३ क्विंटल, फळांची १ हजार ९७ क्विंटल तसेच कांदा, बटाट्याची १२ हजार ५३४ क्विंटल इतकी सरासरी आवक आहे. विभागात सरासरी ९९.२५८ लाख लिटर दुधाचे संकलन होत असून सरासरी २२.९०६ लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण होते. उर्वरित दूध सुट्ट्या स्वरुपात वितरित करण्यात येते.

वाचा:  राहुल गांधींचा आदित्य ठाकरेंना फोन; महाराष्ट्र सरकारच्या कामाचे केले कौतुक

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुण्यात पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर संभाव्य धोका ओळखला आणि त्यादृष्टीने टप्प्याटप्प्याने पावले उचलण्यास सुरुवात केली. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला तर इतर समस्यांवर मात करणे अवघड नाही, हे लक्षात घेऊन नियोजन केले. व्यापारी महासंघ, दूध उत्पादक, दूध वितरक, अन्नधान्य व्यापारी, शेतकरी गट यांच्याबरोबर चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले.

वाचा:  रद्द झालेल्या दहावीच्या भूगोलाच्या गुणांचा फॉर्म्युला ठरला; इतर विषयांच्या सरासरी इतके गुण मिळणार

दरम्यान, पुणे शहरातील निवासी सोसायट्यांमध्येही पॅकेजिंग स्वरुपात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रशासनाच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे व निर्णयांमुळे  नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात टळण्यास मदत झाली. हाच पुणे पॅटर्न इतर जिल्ह्यात अंमलात आणण्यात आल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App