पोल्ट्री उद्योगाला भविष्यात अधिक चांगले दिवस

Smiley face < 1 min

ई ग्राम : सध्या काही काळ पोल्ट्री उद्योग अडचणीत असला तरी देशातील एकूण ग्राहक संख्या बघता पोल्ट्री उद्योगाला भविष्यात अधिक नक्कीच चांगले दिवस आहेत. त्यामुळे उत्पादन ते विक्री सर्वच क्षेत्रात संधी आहेत. असे मत श्रीकृष्ण गांगुर्डे, संचालक, AV बॉयलर्स यांनी अॅग्रोवन फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन नंतर पोल्ट्री उद्योगातील संधी या विषयावर मार्गदर्शन केले.

वाचा:  तृतीयपंथीयांशी संवदनशीलतेने वागा; केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

यावेळी बोलताना गांगुर्डे म्हणाले कि पोल्ट्री उद्योगात सध्या फक्त उत्पादनावर लक्ष दिले जाते. पण भविष्यात “उत्पादक ते ग्राहक” याचा विचार करता पोल्ट्री उद्योगात येणाऱ्या नवीन तरुणांनी उत्पादनासोबत विक्रीवर लक्ष दिले पाहिजे. मागच्या काही काळात अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाला फटका बसला. त्यामुळे भविष्यात थेट ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी पोल्ट्री उद्योगाने प्रयत्न केले पाहिजेत. असे मत गांगुर्डे यांनी व्यक्त केले.

वाचा:  तृतीयपंथीयांशी संवदनशीलतेने वागा; केंद्रीय गृहमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

ॲग्रोवन फेसबूक लाईव्ह
१५ मे, सायंकाळी ७ वा
अजित कोरडे, शेतकरी
विषय : टोमॅटो वरील नवीन रोग आणि निर्माण झालेल्या समस्या

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App