जैविक कीटकनाशक :व्हर्टिसिलिअम लेकॅनी

कृषिकिंग : व्हर्टिसिलिअम लेकॅनी या जैविक कीटकनाशक परोपजीवी बुरशीबद्दल थोडक्यात माहिती घेऊ.

व्हर्टिसिलिअम लेकॅनी ही एक परोपजीवी बुरशी असून तिचे बदललेले नाव लेकानिसिलिअम लेकॅनी असे आहे. तिचा उपयोग पिकावरील रस शोषणाऱ्या मृदुकाय किडी, पिठ्या ढेकूण, खवले कीड, पांढरी माशी, फुलकिडे, मावा, तुडतुडे, लाल कोळी यांच्या नियंत्रणासाठी होतो.

कार्य करण्याची पद्धत
या जैविक बुरशीचे बीज जेव्हा रस शोषणाऱ्या किडीच्या त्वचेच्या सानिध्यात येते तेव्हा ते कीटकांच्या अंतर्गत भागावर वाढू लागते. बुरशी अतिशय जलद गतीने किडीच्या अंतर्गत भागात वाढते. ही बुरशी बॅस्सीअनोलीड आणि डीपिकोलिनीक आम्ल हे विष तयार करते त्यामुळे कीड ४८ ते ७२ तासात मरून जाते.

वापरण्याचे प्रमाण
१० लिटर पाण्यात व्हर्टिसिलिअम लेकॅनी ५० ग्रॅम+ ५ मिली सूर्यफूल तेल + ५ मिली स्टिकर + ५० मिली दूध मिसळून फवारणी करावी.

डॉ. अंकुश जालिंदर चोरमुले
स्त्रोत: कृषिकिंग ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१७

Read Previous

कांदा सल्ला: कांदा काढण्याअगोदर हे करा..

Read Next

शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – खा. संभाजीराजे