भाजपकडून २२ तारखेला ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ महाराष्ट्र बचाव आंदोलनाची हाक

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम : राज्यातील कोरोनाच्या मुद्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झालेत. लॉकडाऊनच्या काळात भाजपने सरकारविरोधी आंदोलनाची हाक दिली आहे. २२ मे रोजी भाजपच्या वतीने ‘मेरा आंगन मेरा रणांगण’ महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत भाजपकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोना वाढता फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

वाचा:  अरबी समुद्रात घोंगावणार ‘निसर्ग’चक्रीवादळ; हरिहरेश्‍वर किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

यावेळी पाटील म्हणाले की, “महाराष्ट्रात कोरोनाचा पेशंट ९ मार्चला सापडला. त्याच दिवशी केरळमध्ये ही कोरोनाचा पेशंट सापडला. ७०दिवसांमध्ये केरळमधील लोकसंख्या ही एक हजारापार गेली नाही. तीच संख्या महाराष्ट्रात ४० हजारच्या दिशेने चाललेली आहे. यात मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. या ७० दिवसात महाविकास आघाडी सरकारने काही उपाययोजना केल्या नाहीत. उपाययोजना करण्याबाबत सरकार पूर्ण पणे अपयशी ठरले आहे”, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

वाचा:  आजपासून देशात २०० रेल्वे धावणार; १ लाखाहून अधिक नागरिक प्रवास करणार

दरम्यान, येत्या २२ तारखेला ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ महाराष्ट्र बचाव आंदोलन सकाळी ११ ते १२ या वेळेत करण्यात येणार आहे. यासंदर्भात तसे तहसीलदार, जिल्ह्याधिकारी यांना कळवण्यात आले आहे. हे आंदोलन नागरिकांनी स्वतःच्या दारात उभे राहून आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करून करायचे आहे. तसेच सरकारचा निषेध म्हणून काळा मास्क, शर्ट, टॉवेल अशा वस्तूचा वापर करून हे आंदोलन करण्यात येणार आहे, असेही पाटील म्हणाले.

वाचा:  केंद्राकडून लॉकडाऊन ५ ची तयारी पूर्ण; 'या'भागातील निर्बंध कडक होणार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App