…भाजपा आपली सुटकेस भरतेय, प्रियांका गांधींचा आरोप

Smiley face < 1 min

ई ग्राम : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी शुल्कामध्ये वाढ केली आहे. या वाढीनंतर पेट्रोल आणि डिझेल किमतीवर अनुक्रमे 10 आणि 13 रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या या निर्णयावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी टीका केली आहे. तसेच, भाजपा स्वत:ची सुटकेस भरण्याचं काम करत असल्याचा आरोपही प्रियंका यांनी केलाय.

वाचा:  टोळधाडीचे संकट नियंत्रणासाठी कीटकनाशकांचा मारा, अग्निशमन बंब, ड्रोन सज्ज: कृषीमंत्री

गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौट वरून यासंबधातील ट्वीट करत त्या म्हणाल्या कि ”कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात कपात झाली असून सर्वसामान्य जनतेला याचा फायदा मिळायला हवा. मात्र, भाजपा सरकार सातत्याने एक्साईज ड्युटी वाढवत असून जनतेला मिळणारा सगळा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला आहे.

वाचा:  कोरोनापासून बचावा करणार होमिओपॅथिक औषधं; तज्ज्ञांचा मोठा खुलासा

दरकपातीचा फायदा जनतेला भेटत नसून जो पैसा सरकारला भेटत आहे, त्यातूनही मजूर, मध्यमवर्ग, शेतकरी आणि उद्योजकांची मदत होताना दिसत नाही. अखेर सरकार पैसा कुणासाठी जमवतं आहे?” असा सवालही प्रियंका गांधींनी विचारला आहे. प्रियंका गांधींनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारला लक्ष्य केले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App