उद्योगवाढीसाठी जागतिक कडधान्य महासंघाचे भारताला सहकार्य – ब्राऊन

पुणे : भारतातील कडधान्य उद्योगाच्या वाढीसाठी सहकार्य करण्यास जागतिक कडधान्य महासंघ कधीही तयार आहे, असे महासंघाच्या अध्यक्षा सिंडी ब्राऊन यांनी सांगितले. लोणावळा येथे सुरू असलेल्या पाचव्या आंतरराष्ट्रीय कडधान्य परिषदेत हजेरी लावणाऱ्या ब्राऊन यांनी माध्यमांशी चर्चा केली.

यावेळी ब्राऊन म्हणाल्या, मी स्वतः कडधान्य उत्पादक शेतकरी आहे. त्यामुळे व्यापार आणि उत्पादन अशा दोन्ही बाजूने मी सतत विचार करते. माझ्या मते भारतीय कडधान्य उद्योग भविष्यात उत्पादन व वापर या अंगाने विकसित होत जाईल. या प्रक्रियेत आंतरराष्ट्रीय पातळीवरील कडधान्य महासंघ म्हणून आमची भूमिका मदतीची राहील.

वाचा :   पूरग्रस्ताच्या मदतीसाठी जिल्हातील नेते सरसावले

“जगातील कडधान्याचा प्रमुख आयातदार देश म्हणून भारताकडे इतर देशांचे लक्ष लागून असते. भारतातील स्थानिक उत्पादन वाढत आहे. त्याचा परिणाम इतर देशांमधील निर्यातीवर झालेला दिसतो. याशिवाय विविध देशांचे नियम संबंधित कडधान्य उत्पादक देशांवर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम करीत असतात. अर्थात जगभर नैसर्गिक प्रथिनांच्या वापराकडे ग्राहक वळत आहेत. त्यामुळे कडधान्याचा वापर वाढतो आहे. परिणामी उत्पादक देशांच्या संधीही विस्तारत आहेत,” असे ब्राऊन यांनी सांगितले.

वाचा :   विदर्भात गारपीटीचा इशारा

‘अपेक्षित उत्पादनाअभावी दर जास्त राहणे अपेक्षित’
कडधान्य बाजारपेठेची ताजी स्थिती काय राहील, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सध्या कोणताही निष्कर्ष काढता येत नसल्याचे स्पष्ट केले. “कडधान्य उत्पादक ऑस्ट्रेलियातील काही प्रांतात दुष्काळी स्थिती आहे. उत्तर अमेरिकेत जादा पावसाची स्थिती होती. भारतामधील कडधान्य क्षेत्रदेखील प्रतिकूल हवामानाच्या स्थितीतून जात आहे. गेल्या हंगामात काही डाळींचे दर तेजीत होते. अर्थात मागणी व पुरवठ्याचे गणित सुरळीत नसल्याने ही तेजी होती. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळाले नसल्याने दर जास्त राहणेदेखील अपेक्षित आहे,” असे ब्राऊन म्हणाल्या.

वाचा :   पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरु
Read Previous

महापरिक्षा पोर्टलला रामराम ; अशी होणार ७२ हजार पदांची भरती

Read Next

रोहयोतील गैरप्रकारप्रकरणी सीईओंकडे तक्रार