बारामतीत सापडला कोरोनाचा १४ वा रुग्ण; रुग्ण पुण्याहून घरी परतलेला

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम : बारामतीत शहरात कोरोनाचा १४ वा रुग्ण सापडला आहे. संबंधित रुग्ण शहराच्या MIDC येथील कल्याणीनगर भागातील आहे. हा रुग्ण ३० वर्षीय युवक असून तो पुण्याहून घरी आला होता. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने यांनी याबाबत माहिती दिली. या सापडलेल्या कोरोना रुग्णांवर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

वाचा:  लॉकडाऊन ५.० साठी अमित शाह यांची देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा

बारामतीत आज सापडलेला रुग्ण हा पाच दिवसांपूर्वी त्याच्या घरी बारामती येथे आला होता. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातही कोरोना रुग्ण आढळले आहेत, बारामतीत एकुण कोरोना रुग्णांची संख्या १४ वर पोहचली आहे.

बारामती शहरात आज रुग्ण सापडल्याने कल्याणी परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. तसेच आसपासचे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आले आहे. नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नका, बाहेर पडताना तोंडाला मास्क आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन करा. बाहेर पडताना सॅनिटायझरचा योग्य वेळी वापर करा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाचा:  कोरोना संकटामुळे राज्यपालांचे राजभवनाला खर्चकपातीचे आदेश

दरम्यान, आज सापडलेला रुग्ण पुणे येथून आला आहे. पुणे – मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात पसरत आहे. बारामती २८ एप्रिलला कोरोना मुक्त झाली होती. शहरातील सर्व दुकाने नुकतीच सुरू करण्यात आली आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App