“महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका – जितेंद्र आव्हाड

Smiley face < 1 min

ई ग्राम : महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका. असे ट्विट आपल्या ट्विटर अकौंट वरून करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्यावर टीका केली आहे.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटर वर एक बातमी शेअर करत, महाराष्ट्रात का राष्ट्रपती राजवट लावू नये ? असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर म्हणून आव्हाड यांनी ट्विट केले आहे. आपल्या ट्विट मध्ये आव्हाड म्हणाले कि “महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागु करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांनो “महाराष्ट्र झोपला आहे” असे समजू नका” याबरोबर आव्हाड यांनी #रडीचाडाव असा हॅशटॅग वापरला आहे.

वाचा:  चिंताजनक! अख्खी मुंबई कोरोनाच्या विळख्यात; रुग्णसंख्या पोहोचली…

आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी पुढे असे म्हटले आहे कि, “आताच योग्य वेळ आहे पुढे तशी वेळ येणार नाही. उद्धव ठाकरे आताच महाविकासआघाडी तोडा नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुम्हाला उध्वस्त करून टाकतील.” त्यामुळे सुब्रमण्यम स्वामी यांच्या या ट्विटमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु झाली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App