रोजगार गेला? आता मिळणार घर बसल्या काम, कसे ते वाचा…

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना काम मिळत नाही. त्याचबरोबर दुष्काळातदेखील लोकांना काम मिळत नसल्याने पूर्वीदेखील मोठ्याप्रमाणात नागरिक स्थलांतर करीत असत. याबाबत तत्कालीन विधान परिषद उपसभापती आमदार डॉ. गोऱ्हे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. आमदार गोऱ्हे या उपसभापती या पदावर असताना तत्कालीन रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर; तसेच सध्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्यासोबत बैठक घेतल्या होत्या.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

रोहयोच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. त्यामुळे अशा कामाची मागणी व्हॉट्सअॅपवर आली तरी त्याला मंजुरी मिळणार आहे. यासाठी त्या सामाजिक संघटनांच्या मदतीने अंमलबजावणीसाठी मदत सेतू (सपोर्ट नेटवर्क) उभारणार आहेत.

मजुरांना काम मिळताना शासकीय किचकट प्रक्रियातून जावे लागते. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर कामाचे मागणी पत्र आले तर ते मान्य करण्याची सूचना त्यांनी देखील केली होती. आज याची पूर्तता झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिकांच्या ४६ हजार कामांवर पाच लाख ९२ हजार मजुरांची उपस्थिती असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विधवा व एकल महिलांना त्यांच्या शेतात कामे मंजूर करून देण्याबाबत विनंती केली आहे.

वाचा:  मुंबई, पुण्यातील लॉकडाउनबाबत झाला 'हा' निर्णय

आमदार गोऱ्हे यांच्या कार्यालयातून प्रत्येक दहा दिवसाला यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. रोहयोची कामे मिळण्यात कोणाला काही अडथळे येत असतील तर त्यांनी ईमेल आयडी- [email protected] किंवा [email protected] यावर संपर्क करण्याचे आवाहन आमदार गोऱ्हे यांनी केले.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App