गुगल फार्म, व्हॉट्सअपच्या मदतीने ‘फार्म टू फोर्क’

Smiley face 2 min

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अलिबाग येथील ‘कु कू च कु’ पोल्ट्री फार्म समूहाद्वारे मुंबई शहरातील सोसायट्यांना फ्रोजन चिकन व अंड्यांची थेट विक्री सुरू करण्यात आली आहे. फेसबुक- व्हॉट्सअप, गुगल फॉर्म, गुगल पे किंवा भीम अॅप सारख्या माध्यमांच्या आधारे थेट विक्री सुरू आहे. लॉकडाऊनच्या कोंडीत प्रोड्यूसर ते कन्झ्यूमर थेट विक्रीचा एक यशस्वी प्रयोग म्हणून याकडे पाहिले जात आहे.

‘कु कू च कु’ समूहाकडे उत्तम दर्जाच्या कोंबडी उत्पादनांसाठी लागणारे ब्रीडर फार्म, हँचरी, ब्रॉयलर फार्म, फिडमिल आणि प्रोसेसिंग प्लांट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. लॉकडाऊनपूर्वी ‘कु कू च कु’ Barbeque Nation, Tunga International, Take away व इतर वितरकांना फ्रेश/फ्रोजन चिकन पुरवठा सुरळीत होता. ‘कु कू च कु’ कंपनीकडे चिकन प्रोसेसिंग प्लांट, दोन शीत वाहने आणि मनुष्यबळाची उपलब्धता आहे. त्याचा उपयोग आता लॉकडाऊनमध्ये होत आहे. ग्राहकांना घरपोच पॅक फ्रोजन चिकन पुरवठा सुरू केला आहे. प्रॉडक्ट रेंज पुढीलप्रमाणे आहे. – प्रीकट चिकन, चिकन ब्रेस्ट बोनलेस, चिकन लेग बोनलेस, चिकन ड्रमस्टिक, लॉलिपॉप, काळीज/पेठा व अंडी ट्रे. या प्रॉडक्ट्सच्या किंमतीसुद्धा इतर ऑनलाईन प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपनीच्या मानाने वाजवी आहेत.

वाचा:  अनाबेशाही ते आरा 15 'कसमादे'त सहा दशकात काय कमावले, काय गमावले..?

‘कु कु च कू’ समूहाचे संचालक कुणाल दिलीप पाथरे म्हणाले, की आमच्या कंपनीने मुंबई परिसरातील सोसायट्यांना चिकन खरेदीसाठी मागणी नोंदवण्याचे आवाहन फेसबुक व व्हॉट्सअप या सोशल मीडियाद्वारेद्वारे केले होते. त्यास खरोखरंच चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच आमच्या कामगारवर्गाला सुद्धा सोसायटी मध्ये चांगली वागणूक मिळत आहे. सर्व ग्राहकांचे समाधान पाहून आम्ही सुद्धा भारावून गेलो व जास्तीत जास्त ग्राहकांना या सुविधेचा पुरवठा करण्यासाठी आम्हालाही उत्तेजन मिळाले. खरेदीसाठी पुढे आलेल्या सोसायट्यांना गुगल फॉर्मची लिंक देण्यात येतें. याद्वारे ग्राहकाचे नाव, मोबाईल, ईमेल इत्यादी माहितीबरोबरच कोणते प्रॉडक्ट किती प्रमाणात हवे याचा तपशील आम्हाला उपलब्ध होतो. त्यानुसार अंडी व चिकनची पोच सोसायटीची जबाबदार व्यक्ती, जसे चेअरमन, सेक्रेटरी यांच्याकडे दिली जाते. यामुळे कमीत कमी व्यक्तिंचा संपर्क होत सोशल डिस्टन्सिंगचा हेतूही साध्य होतो.

वाचा:  अनाबेशाही ते आरा 15 'कसमादे'त सहा दशकात काय कमावले, काय गमावले..?

‘कु कु च कू’ च्या थेट विक्रीची बाजू ओंकार दिलीप पाथरे हे सांभाळत आहेत. कंप्युटर इंजिनअर असलेल्या ओंकार यांनी लंडनमध्ये 15 वर्ष सोल्यूशन आर्किटेक्ट म्हणून काम पाहिले आहे. ते म्हणाले, की आम्ही विशेष कुठलेही खर्चिक तंत्रज्ञान वा सिस्टिम वापरले नाही. सर्वसामान्यांना परिचित असलेले गुगल फॉर्म्स, गुगल पे सारखे प्लॅटफॉर्म उपयोगात आणले. लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत सोशल मीडिया हे ग्राहकापर्यंत पोचण्याचे सहज सोपे साधन आहे त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
– दीपक चव्हाण, ता. 17 एप्रिल 2020

वाचा:  अनाबेशाही ते आरा 15 'कसमादे'त सहा दशकात काय कमावले, काय गमावले..?

संपर्क – श्रेयस पाथरे ७७९८८८९६४६, ओंकार पाथरे ७७९८८८९५४०

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

70 − = 66