अंतिम वर्षाच्या बॅकलॉगची परीक्षा होणार, पुणे विद्यापीठाची माहिती

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम : अंतिम वर्षाच्या बॅकलॉगची परीक्षा होणार आहे असे पुणे विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे. फक्त अंतिम सत्राची परीक्षा होणार आहे. इतर सत्राच्या परीक्षा ह्या नवीन वर्षात होणार आहे. विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर आता विद्यापीठाने हे स्पष्टीकरण दिलेले आहे.

राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची केवळ अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा होणार आहे. बाकी कोणतीही परीक्षा होणार नाही. असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले होते. परंतु, परीक्षा कशा आणि कधी घ्यायच्या याबाबत विद्यापीठ ठरवणार आहे.

वाचा:  देशात १ जूनला होणार मान्सूचे आगमन, हवामान खात्याचा अंदाज

दरम्यान, राज्यातील शेवटच्या सत्रात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार आहेत. याच बरोबर शेवटच्या सत्रात बॅकलॉगला असणाऱ्यांची ही परीक्षा होणार इतर वर्षाच्या परीक्षा ह्या नंतर घेण्यात येणार आहेत, असे पुणे विद्यापीठाने सांगितले आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App