ई ग्राम टीम : “नव्याने पोल्ट्री व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांनी काही काळ थांबा, पहा आणि मगच धोरणे अंमलात आणा. नवे फार्म उभारण्याऐवजी बंद पडलेले युनिट्स कराराने किंवा भागिदाराने चालवणे अधिक योग्य ठरेल. कारण, एकीकडे अनेक पोल्ट्री युनिट्स बंद पडत असताना, ते वापरात नसताना, नव्याने स्ट्रक्चर्स उभे करणे म्हणजे राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय आहे” असे व्यंकटेश्वरा हॅजरिजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रातील एकूण ब्रॉयलर्स बर्ड प्लेसमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मर्सचा मोठा वाटा आहे. सध्याच्या पेचप्रसंगामुळे पोल्ट्री शेडमध्ये कमी बॅचेस निघत आहेत. पर्यायाने कॉन्ट्रॅक्ट फार्मर्सचेही उत्पन्न घटतेय. मात्र, जे शेतकरी चांगला एफसीआर राखतात. उत्तम व्यवस्थापन करतात. त्यांच्याकडे प्लेसमेंट नियमित राहिल. एकूण व्यवस्थापन आणि एफसीआर सारख्या परफॉर्मन्सबाबत तक्रार असेल, तर त्यासंदर्भात आपली कामगिरी सुधारण्याची संधी म्हणून या संकटाकडे पाहिले पाहिजे.”
दरम्यान, पोल्ट्री उद्योगात दर दहा वर्षांनी मोठे बदल होतात. यापुढील काळ हा ग्राहककेंद्रीत उत्पादन व पुरवठासाखळी विकसित करण्याचा आहे. ड्रेस्ड चिल्ड चिकन, पोर्शन विक्री यासाठीची प्रक्रिया, पुरवठा साखळी मजबूत करणे, केवळ उत्पादन केंद्रीत नियोजनाऐवजी बॅकवर्ड व फॉरवर्ड इंटिग्रेशन साधणे आवश्यक ठरेल. बाजारातील बदलले ट्रेंड लक्षात घेत, त्याप्रमाणे बदलण्याशिवाय पर्याय नाही, असे डॉ. पेडगावकर यांनी नमूद केले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.