‘चिकनसाठी सरासरीच्या चाळीस टक्केच मागणी’ शेतकऱ्यांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन घ्यावे…

Smiley face < 1 min

पुणे :  कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था ठप्प असल्याने चिकनला नेहमीसारखा उठाव नाही. पोल्ट्री उद्योगातील नफ्या-तोट्याची समीकरणे बदलली आहेत. ब्रॉयलर्स पक्ष्यांसाठी पुढील काळात सरासरीच्या ४० टक्केच मागणी गृहीत धरून उत्पादनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरेल, असे व्यंकटेश्वरा हॅजरिजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांनी म्हटले आहे.

कोरोना संसर्ग व लॉकडाऊनबाबत येत्या काळातही अनिश्चितता दिसतेय. या पार्श्वभूमीवर पोल्ट्री उद्योगात कॉन्ट्रॅक्ट फार्मर्स, ओपन फार्मर्स, लहान व मध्यम इंटिग्रेटर्स आणि बड्या कॉर्पोरेट्सची यापुढील वाटचाल कशी राहील, याबाबत डॉ. पेडगावकर यांनी भाष्य केले. 

वाचा:  मुलींच्या लग्नाचे स्वप्न क्षणात भस्म!, आईचा हंबरडा

यावेळी ते म्हणाले की, “ओपन फार्मर्स असो वा इंटिग्रेटर्स  सर्वांनी मागणीच्या प्रमाणात उत्पादन संतुलित करणे सयुक्तिक ठरेल.  खासकरून महाराष्ट्रातील पोल्ट्री उद्योगाने बदलती व्यावसायिक गणिते लक्षात घेतली पाहिजेत. जर ४० टक्केच मागणी राहणार असेल तर प्रत्येकाने त्या प्रमाणात उत्पादन राखले पाहिजे. आपल्या एकूण उत्पादनात बाजारातील मागणीच्या रेशोत कपात केली पाहिजे. जेणेकरून तेजी-मंदीत टिकून राहणे शक्य होईल. दक्षिण भारतातील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रतिडोई चिकनचा खप कमी आहे. महाराष्ट्रात मांसाहार हा नैमित्तिक आणि आठवड्यातील विशिष्ट दिवसांपुरता मर्यादित आहे, असे डॉ. पेडगावकर म्हणाले. 

वाचा:  उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘या’ समितीचे अध्यक्षपद सोडले

दरम्यान, “गेल्या दोन दशकात पोल्ट्री इंटिग्रेटर्सनी केवळ उत्पादन केंद्रीय वाढ-विस्तारावर भर दिले. यापुढे चिकनप्रक्रिया आणि थेट विक्रीकडे वळावे लागेल. ग्राहकांच्या आवडीनुसार पोर्शनिंगनुसार फ्रेश, चिल्ड वा फ्रोजन चिकन योग्य दरात विकण्यावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. त्यासाठीचे लॉजिस्टिक – सप्लाय चेनमध्ये गुंतवणुक वाढवावी लागेल. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण चिकन थेट ग्राहकापर्यंत पोचवण्याऱ्या लोकल ब्रॅंड् उद्य होताना दिसत आहे. त्या दृष्टिने यापुढे नियोजन आवश्यक ठरेल.” असे ते म्हणाले.

वाचा:  साखर हंगामाच्या सुरूवातीलाच ऊसतोडणी मजुरांची टंचाई; गाळपावर परिणाम

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App