वायदा बाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

Smiley face < 1 min

ई-ग्राम: वायदे बाजरात सोयाबीनच्या जून आणि जुलै महिन्याच्या वायद्यात घट पाहायला भेटली असून अनुक्रमे १८ आणि २२ रुपयाची घट दुपारी ३ वाजेपर्यंत पाहायला भेटली. सोयाबीनचे इंदोर मार्केट मधील बाजारभाव ०.१% ची घट होऊन सोयाबीनचे हजर बाजारातील भाव ३९७१ वरून ३९६३ रुपयावर पोचले आहेत.

हळदी आणि चण्याच्या वायदे बाजारात आज चांगली वाढ झालेली आहे. हळदीच्या जून महिन्याच्या वायदा ५३१६ रुपयावर पोचला असून यात २८ रुपयाची वाढ झाली आहे तर जुलै महिन्याच्या वायद्यात ५६ रुपयाची वाढ झालेली आहे. जुलै महिन्याचे हळदीचा वायदा ५३५२ रुपयांवर गेला आहे. निझामाबाद मधील हळदीच्या हजर बाजारात मात्र ०.०३% टक्क्याची घट होऊन हळदीचे भाव क्विंटल मागे ५२३९ रुपयावर पोचले आहेत.

वाचा:  वायदाबाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

चण्याच्या वायदे बाजारात अनुक्रमे ९ आणि ७ रुपयांची वाढ झालेली असून चण्याचे वायदे ४०९७ आणि ४१३० रुपयांवर पोचले आहेत. चण्याच्या दिल्लीच्या हजरबाजारात ०.१३ टक्क्याची घट होऊन ४१६७ रुपये प्रतिक्विंटवर पोचले आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App