शेतकऱ्यांसाठी सरकारने लाँच केले ‘किसान रथ’ अ‍ॅप, पिकांची विक्री होणार सोपी

Smiley face < 1 min


ई ग्राम :
कोरोना व्हायरसमुळे सरकारने देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना आपले पीक, भाजीपाला विकण्यास समस्या निर्माण होत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या बघून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण, ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी कृषि उत्पादनांच्या परिवहनात अडचण येऊ नये म्हणून किसान रथ मोबाईल अ‍ॅप लाँच केला आहे. किसान रथ अ‍ॅपद्वारे शेतकरी आणि व्यापारी सहज पिकांची खरेदी-विक्री करू शकतात.

शेती उत्पादनांच्या वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी ‘किसान रथ’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या या मोबाईल अ‍ॅपची निर्मिती राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी केली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले.

वाचा:  १ जून पासून बदलतायेत रेशन कार्ड संदर्भातील अनेक नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम

केंद्रीय कृषी मंत्रालयाने अन्नधान्य तृणधान्य, भरडधान्ये, कडधान्ये तसेच फळे व भाजीपाला, तेलबिया, मसाले, तंतुमय पिके, फुले, बांबू, लवंग आणि किरकोळ वनोत्पादन, नारळ या सारख्या विविध गोष्टींच्या सुलभ वाहतुकीसाठी हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या अ‍ॅपवर नाशवंत मालाच्या वाहतुकीसाठी शीतगृह सुविधेद्वारे व्यापाऱ्यांना मदत होणार आहे. कृषी आणि बागायती उत्पादनाच्या प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील वाहतुकीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वाहतूक साधनांची सेवा उपलब्ध व्हावी यासाठी या अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे.

वाचा:  मुंबई, पुण्यातील लॉकडाउनबाबत झाला 'हा' निर्णय

शेतकरी गुगल प्ले-स्टोरवरून हे अ‍ॅप मोफत डाऊनलोड करू शकता. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर नाव, मोबाईल नंबर आणि आधार नंबर सारखी खाजगी माहिती देत रजिस्ट्रेशन करावे लागेल. व्यापारी देखील स्वतःची माहिती देत रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशननंतर मोबाईल नंबर आणि पासवर्डद्वारे अ‍ॅपमध्ये लॉगइन करता येईल. किसान रथ अ‍ॅप इंग्रजी, हिंदी, गुजराती, मराठी, पंजाबी, तामिळ, कन्नड आणि तेलगू भाषेत उपलब्ध आहे.

वाचा:  २२ जूनपासून पावसाळी अधिवेशन

सरकाने या अ‍ॅपला लॉकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे खरेदी विक्रीसाठी लाँच केले आहे. जेणेकरून शेतकरी आपला माल सहज विकू शकतील व व्यापारी खरेदी करू शकतील. या अ‍ॅपद्वारे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना परिवहन वाहनांची माहिती मिळेल. अ‍ॅपमध्ये ट्रकच्या येण्याचा वेळ आणि स्थानाबद्दल माहिती मिळेल. या अ‍ॅपद्वारे ट्रांसपोटर्स देखील सामानाच्या वाहतुकीसाठी गाडीचे रजिस्ट्रेशन करू शकतील.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App