एनईसीसीद्वारे अंड्याच्या दरात वाढ

ई-ग्राम : किरकोळ बाजारात अंड्यांच्या मागणीत चांगली वाढ असल्याने राष्ट्रीय अंडी समन्वय समितीद्वारे (एनईसीसी) मुंबईसह महाराष्ट्रात अंड्याच्या भावात तातडीने 25 पैसे प्रतिनग यानुसार वाढ करण्यात येत आहे. ‘एनईसीसी’ मुंबई विभागासाठी प्रतिशेकडा 380 रुपयांवरून 405 रुपयांवर दरवाढ लागू करण्यात आली आहे. किरकोळ मागणीत सातत्याने वाढ होत असून, खपात उठाव दिसत आहे. यामुळेच अंड्याच्या बाजारभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रॉयलर्स कोंबड्यांच्या तुलनेत अंड्यांचे दर कमी प्रमाणात घटले आहेत. तथापि, राज्यात 350 रुपये प्रतिशेकडा दराने अंड्याचे फार्म लिफ्टिंग सुरू होते. उत्पादन खर्चाच्या आसपास बाजारभाव होते. किरकोळ बाजारात चांगली मागणी असतानाही उत्पादन खर्चाच्या दरात अंडी विकणे योग्य नसल्याने दरवाढीचा निर्णय घेतल्याचे एनईसीसीच्या सूत्रांनी सांगितले.

Read Previous

वीज नियामक आयोगाच्या सुनावणीत नाराजीचे स्वर

Read Next

घोषणांचा पाऊस; नियमित कर्जदारांच्या पदरी ‘निराशाच’