बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कोबी, फ्लॉवर , मिरची, वांगी, भेंडी, शेवगा आणि शिमला मिरचीचे बाजारभाव.

Smiley face 2 min

ई ग्राम : राज्यातील तरकारी पिकाचे बाजारभाव खालील चार्ट प्रमाणे: कोबी: कोबीला कळमेश्वर मार्केट मध्ये ८०० ते १४०० रुपयाचा दर भेटला आहे २० क्विंटल कोबीची आवक कळमेश्वर मार्केट मध्ये झालेली होती. परवाच्या मार्केट दराच्या तुलनेत आज १०० ते २०० रुपयाची घट झालेली आहे. तर कामठी मार्केट मध्ये १४०० ते २००० रुपयाचा दर भेटला आहे आवक : ८ क्विंटल , मुंबईत कोबीला ८०० ते १२०० रूपायांचा दर मिळाला आहे. सरासरी दर १००० रुपयाचा राहिला. मुंबईत २२३ क्विंटल कोबीची आवक झालेली होती फ्लॉवर : फ्लॉवरला मुमबी मार्केट मध्ये १२०० ते १४०० रुपयाचा दर मिळाला आहे कालंच्या तुलनेत आज १०० ते २०० रुपयाची घट आलेली आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

मिरीची: हिरव्या मिरचीचे बहजारभाव मुंबई आणि मोशी मार्केट मध्ये स्थिर राहिले आहेत. पुणे मोशी येथे २५०० ते ४००० रुपयाचा दर मिळला आहे, सरासरी दर ३००० राहिला आहे.मोहीत १४४ क्विंटल मिरचीची आवक झाली होती. तर मुबई त २००० ते ३००० रुपयांचा दर राहिला आहे , मुंबईत १४४ क्विंटल मोर्च्याची आवक आलेली होती. वांगी : वांग्याला पनवेल मार्केट मध्ये १६०० ते २४०० रुपयाचा दर भेटला आहे. सरासरी दर २३०० रुपयाचा दर मिळाला आहे. पुणे मोशी येथे १५०० ते २५०० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी दर २५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. मोशी येथे ३४ क्विंटल आवक आलेली होती तर पनवेल मध्ये ४४ क्विंटल.

वाचा:  वायदा-बाजार अपडेट १ जुलै २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

शिमला मिरीचीला : शिमला मिरची ला पुणे मोशी येथे २२०० ते ३००० रुपयाचा दर मिळाला असून काळाच्या तुलनेत २०० ते ३०० रुपयाची वाढ झाली आहे. ६२ क्विंटल शिमला मिरची ची आवक अशी मध्ये झालेली होती. मुमबी मार्केट मध्ये २६०० ते ३००० रुपयाचा दर राहिला असून २८०० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे. मुंबईत ३४ क्विंटल शिमला मरीचीची आवक राहली होती.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

भेंडी : मुंबई मार्केट मध्ये भेंडी ला २५०० ते ३००० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी दर २८०० रुपयाचा दर मिळाला आहे . मुबईत १२९ क्विंटल भेंडीची आवक झालेली आहे. तर चंद्रपूर गंजवाड येथे ८०० ते १००० रुपयाचा दर मिळला आहे. आवक ४४ क्विंटल राहिली आहे.

शेवगा : मोशी मध्ये शेवग्याला २००० ते ३००० रुपयाचा दर मिळाला आहे. सरासरी २५०० रुपयांचा दर मिळाला आहे. मुंबईत शेवग्या २६०० ते ३००० रुपयाचा दर मिळाला आहे सरासरी दर २८०० रुपयाचा राहिला आहे. मुंबई २५० क्विंटल शेवगा मार्केट मध्ये आलेला होता.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App