बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम : आज २9 मे रोजी, राज्यातील महत्वाच्या शेतीमालाचे बाजारभाव खालील चार्टमधील दर्शविल्या प्रमाणे. कांदा : नाशिक जिल्हातील लासलगावसह राज्यातील महत्वाच्या मार्केटमध्ये कांद्याची आवके आणि सरासरी दरामध्ये सुधारणा झाली आहे लासलगाव (आवक : १२००० क्विंटल ) कालच्या तुलनेत क्विंटल मागे ७० ते ८० रुपयाची वाढ क्विंटलमागे झाली आहे. लासलगावमध्ये कांद्याला ४०० ते ९८० रुपयांचा बाजारभाव भेटत असून ८०० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. कालच्या तुलनेत आज सरासरी दरामध्ये ५० रूपयांची सुधारणा झालेली आहे. कळवण मार्केटमध्ये (आवक: १२१५० क्विंटल ) कांदयाला ४०० ते १०५० रुपयाचा प्रतवारी नुसार दर भेटला असून ७५० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ९० ते १०० रुपयाची वाढ झाली आहे. उमराणे मार्केटमध्ये (आवक : १५५०० क्विंटल) दर स्थिर आहेत. उमाराणे मार्केटमध्ये कांद्याला ४०० ते ९६१ रुपयांचा भाव आज भेटला आहे . सटाणा मार्केट ३८५ ते ९२५ रु (आवक : ४५००क्विटल), मनमाड मार्केट ( आवक:४५०० क्वि ) २०० ते ८०० रु.चा दर भेटला आहे . कोल्हापूर आवक : ४७१९ दर : ४०० ते १२०० , सरासरी दर ४९०० , सरासरी दरात १०० रुपयाची वाढ

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

टोमॅटो : आज जुन्नर नारायण गाव मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची आवक झालेली होती. तब्ब्ल ३०८५ क्विंटल टोमॅटो विक्रीसाठी आलेला होता. जुन्नर नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटोला ५०० ते ९०० रुपये प्रति क्विंटलचा दर भेटला असून सरासरी ८०० रुपयाचा दर भेटला आहे. कालच्या तुलनेत आज ५० रुपयाची वाढ क्विंटल मागे झालेली आहे. नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सुद्धा आज टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली असून ४५२० क्विंटल टोमॅटो विक्री साठी आलेला होता. संगमनेर येथे टोमॅटो ला ५०० ते १००० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी दर ७५० रुपयाचा भेटला आहे.( मुबई आवक : ५०० क्विंटल, दर ८०० ते १६०० , सरासरी दर १४०० प्रति क्विंटल ; पनवेल आवक ७७२ , दर १५०० ते २००० सरासरी दर १७५०)

कापूस : कपाशीला राज्यात ५२३० ते ५३५० रुपयाचा दर मिळाला असून राज्यतील भाव स्थिर आहेत. अकोला येथे २७९५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर दर ५३५० रुपयांचा राहिला. पैठण येथे आवक १८३७ राहिली तर, दर ५३५० रुपयांच्या दरम्यान राहिला. पुलगाव येथे १९०० क्विंटल कापसाची आवक झालेली होती. तर ४००० ते ५३५५ चा दर मिळाला असून ५२०० रुपयाचा सरासरी दर मिळाला आहे.

वाचा:  वायदा-बाजार अपडेट २९ जून २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार

सोयाबीन :सोयाबीनला राहता मार्केटमध्ये ३८०० रुपयाचा दर मिळाला आहे. तर आखाडा बाळापूर येथे ३८०० ते ३९०० रूपाचा दर मिळाला आहे. अकोला मार्केट ३२०० ते ३५५० (आवक : १५०० क्विंटल ) लोणार येथे ३५२५ ते ३८५० रुपयाचा दर मिळाला आहे. (आवक १३०० क्विंटल ).

तूर: तुरीला दुधनी मार्केट मध्ये सुधारणा झाली असून तुरीचे दर ५०२५ ते ५३०० रुपया पर्यंत बाजारभाव मिळाला आहे. सरासरी दर ५२०० रुपयाचा राहिला. चिखली येथे तुरीला ४६०० ते ५१०० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी दर ४७५० रुपये राहिला आहे. मूर्तिजापूर मार्केट मध्ये तुरीला १६४० क्विंटल तूरीची आवक झालेली होती.४८०० ते ५१५० रुपयाचा दर मिळाला आहे.

मका: आज लासलगाव मार्केटमध्ये मक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झालेली होती. २४४५ क्विंटल मका विक्री साठी आलेला होता. मक्याला लासलगाव मार्केट मध्ये १००० ते १३१२ रुपयाचा दर मिळाला असून १२६० रुपयांचा दर मिळाला आहे. लासलगाव मार्केट मध्ये आज मक्याच्या दरामध्ये सुधारणा झालेली आहे. धुळे मार्केटमध्ये २००० क्विंटल मक्याची विक्री झालेली असून ८७६ ते १२६० रुपयाचा दर मिळाला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

हळद : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या सांगली मार्केटमध्ये हळदीची तुफान आवक झालेली असून तब्ब्ल ८५५६ क्विंटल हळद विक्रीसाठी आलेली होती. हळदीला सांगलीमध्ये ३८८८ ते १३१०० रुपयाचा दर मिळाला असून सरासरी दर ५६०० रुपयाचा भेटला आहे. त्याच प्रमाणे हिंगोली कानेगाव नका येथे हळदी ला ४६०० ते ४८०० रुपयाचा दर मिळाला आहे (आवक: ४६०० ). भोकर मध्ये हळदी ला ४०८५ ते ४८८५ रुपयांचा दर मिळाला आहे. मोर्शी मार्केट मध्ये ३००० ते ५०५० रुपयाचा दर मिळाला आहे.

देशातील कांदा , टोमॅटो आणि बटाटा मार्केट रेट : देशातील कांदा आणि टोमॅटो मार्केट मध्ये आज सुधारणा झालेली आहे तर बटाट्याचे दरा मध्ये नरमाई आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App