बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम : आज ३०मे रोजी, राज्यातील महत्वाच्या शेतीमालाचे बाजारभाव खालील चार्टमधील दर्शविल्या प्रमाणे. कांदा : नाशिक जिल्हातील लासलगावसह राज्यातील महत्वाच्या मार्केटमध्ये कांद्याची आवके आणि सरासरी दरामध्ये सुधारणा झाली आहे लासलगाव (आवक : ९५००)कालच्या तुलनेत क्विंटल मागे १० ते २० रुपयाची वाढ क्विंटलमागे झाली आहे. लासलगावमध्ये कांद्याला ४०० ते ९८५ रुपयांचा बाजारभाव भेटत असून ८१० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. कालच्या तुलनेत आज सरासरी दरामध्ये २०रूपयांची सुधारणा झालेली आहे. कळवण मार्केटमध्ये (आवक: क्विंटल ) कांदयाला ४०० ते १००१ रुपयाचा प्रतवारी नुसार दर भेटला असून ७७५ रु सरासरी दर भेटला आहे. येवला मार्केट मध्ये ६५०० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर १०० ते ८४५ रुपया पर्यंत राहिला. सरासरी दर ५७० रुपये. मनमाड मार्केट मध्ये २००० क्विंटल कांद्याची आवक झाली होती दर २०० ते ८५० रुपयाचा राहिला. सरासरी दर ६५० रुपयाचा मिळाला. कोपरगाव मार्केट मध्ये ४२९० क्विंटल कांद्याची आवक झालेली होती तर दर १०० रू ते ७७६ रुपये राहिला आहे. धुळे मार्केट मध्ये २६२३ क्विंटल कांद्याची आवक झाली होती तर दर १०० ते ७७५ रुपयाचा मिळाला आहे.

वाचा:  वायदा-बाजार अपडेट २९ जून २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार

टोमॅटो : आज पनवेल मार्केट मध्ये कांद्याची आवकेत वाढ झाल्याने टोमॅटोच्या दरात काही अंशी घट आलेली आहे. आज पनवेल मध्ये ९०० क्विंटल टोमॅटो ची आवक झालेली होती. तर दर १२०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान राहिला आहे.तर सरासरी दर १४०० रुपयाचा मिळाला आहे. मुबई मार्केट मध्ये सुद्धा १२०० ते १६०० रुपयाचा दर मिळाला असून १४०० रुपयाचा दर मिळला आहे. मुबई मार्केट मध्ये ६२० क्विंटल टोमॅटोची आवक झालेली होती. कोल्हापूर मार्केट मध्ये टोमॅटो ला ८०० ते १५०० रुपयाचा दर मिळला असून टोमॅटोच्या दरात मोठी सुधारणा झालेली आहे. सरासरी दर १००० रुपयाचा राहिला असून चांगल्या प्रतीच्या वाणाच्या भावात ५०० रुपयाची वाढ झालेली आहे. (आवक ६०२ क्विंटल ) औरंगाबाद मध्ये १००० ते १३०० रुपयाचा दर मिळाला असून १३० क्विंटल टोमॅटॊची आवक झालेली आहे.

कापूस : कपाशीला राज्यात ३४४९ ते ५३५० रुपयाचा दर मिळाला आहे. . अकोला येथे १२०७ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर दर ५३५० रुपयांचा राहिला. पैठण येथे आवक १९७५ राहिली तर, दर ५३५० रुपयांच्या दरम्यान राहिला. वडवणी मार्केट मध्ये ४८ क्विंटल कापसाची आवक झाली होती. अकोल्याच्या तुलनेत वडवणी मार्केट मध्ये दर खूपच कमी राहिला आहे. फक्त २८०० ते ३२०० रुपयाचा दर वडवणी मार्केट मध्ये भेटला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

सोयाबीन आज राज्यातील सोयाबीनच्या मार्केट मध्ये घसरण झालेली आहे. देशातील वायदे बाजारासह इंदोर च्या हजरबाजारात सुद्धा घट झालेली आहे. मागणी अभावी तात्पुरती घट झालेली असल्याचे स्पष्ट होत आहे. सोयाबीनला अकोला मार्केट मद्ये ३२०० ते ३५८५ रुपयाचा दर मिळाला आहे. अकोल्यात २७४४ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली होती. तर मराठवाड्यातील उदगीर मध्ये सोयाबीन ला ३६०० ते ३६२५ रुपयांचा दर मिळाला आहे. उदगीर मध्ये ४००० क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे. चिखली मध्ये १६०० क्विंटल सोयाबीनची आवक झालेली होती तर दर ३६०० ते ४००० रुपया पर्यंत भेटला आहे. सरासरी दर ३७७५ रुपयाचा मिळाला आहे.

तूर: तुरीला मार्केट मध्ये चांगला उठाव असल्याने आज तुरीचे दर कारंजा मार्केट मध्ये सुधारले आहे. क्विंटल मागे १०० ते १४० रुपयाची वाढ आज झालेली आहे. आज कारंजा येथे २१५० क्विंटल तुरीची आवक झालेली होती. तर दर ४७३० ते ५३५० रुपयाचा राहिला आहे. अकोल्यामध्ये ४७०० ते ५२५० रुपयाचा दर मिळाला आहे (आवक ३१२५ क्विंटल तुरीची आवक झाली होती ). वाशीम मध्ये आज तुरीला उचांकी बाजारभाव मिळाला असून तुरीचे दर ५२५० ते ५४०० रुपयावर पोचले आहेत सरासरी दर ५३०० रुपयाचा भेटला आहे.(आवक ४७८५ क्विंटल )

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

मका: लासलगाव मध्ये मक्याच्या दरात आज किरकोळ घट झालेली दिसून आलेली आहे.८३५ क्विंटल मका विक्री साठी आलेला होता. मक्याला लासलगाव मार्केट मध्ये १००० ते १२९९ रुपयाचा दर मिळाला असून १२४८ रुपयांचा दर मिळाला आहे. धुळे मार्केटमध्ये २०७० क्विंटल मक्याची विक्री झालेली असून ८५० ते १२०० रुपयाचा दर मिळाला आहे. धुळ्यात आज मक्याच्या भावात २० रुपयाची घसरण झालेली आहे. मलकापूर येथे हि मक्याला ९०० ते १२०० रुपयाचा दर मिळाला आहे. सरासरी दर ११३० रुपयाचा राहिला आहे तर आवक १६९८ क्विंटल होती

हळद : वाशीम अनसिंग येथे हळदी ला ४१५० ते ४७०० रुपयाचा दर मिळाला आहे.आवक- २५० क्विंटल:सानेगाव येथे ४५०० ते ५००० रुपयाचा दर हळदी ला भेटला आहे. सरासरी दर ४७८५ रुपयाचा राहिला आहे आवक:१५० क्विंटल

देशातील कांदा , टोमॅटो आणि बटाटा मार्केट रेट :

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App