बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम : राज्यातील महत्वाच्या शेतमालचे बाजारभाव खालील दिलेल्या चार्ट प्रमाणे: टोमॅटो : आज पुणे जिल्ह्यातील टोमॅटोच्या खेड-चाकणमध्ये (आवक : १५८ क्विन्टल) टोमॅटोच्या दरामध्ये सुधारणा झाली असून टोमॅटोचे दर ६०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान झाले असून सरासरी ८०० रु चा दर मिळाला. पनवेल मार्केटमध्ये (आवक : ४४७ क्विंटल) दर कालच्या तुलनेत कमी झाले असून पनवेलमध्ये १३ ते १६ रुपयांवर बाजारभाव पोचले आहेत. काल २० रुपयाचा उचांकी दर मिळाला होता.

कांदा : कळवण मार्केटमध्ये (आवक: ५२०० क्विंटल) आज कांद्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून कालच्या तुलनेत क्विंटल मागे ३० ते ४० रुपयाचा फरक पडला आहे. कळवनमध्ये कांद्याला ४०० ते ८८० रुपयांचा बाजारभाव भेटत असून ६५० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. कोल्हापूर मार्केट मध्ये (आवक: ७३५०) कांदयाला ४०० ते १२०० रुपयाचा प्रतवारी नुसार दर भेटला असून ८०० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. कालच्या तुलनेत १०० रुपयाची वाढ कोल्हापूर मध्ये झाली.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

कापूस : कापसाचे दर महत्वाच्या मार्केटमध्ये स्थिर असून ५३५० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. (अकोला बोलवामंजू आवक २१९५क्विंटल ) (अकोला आवक : १९६१ क्विंटल )

सोयाबीन : वाशिममध्ये (आवक -६६६८ ) सोयाबीनच्या बाजारभावात कालच्या तुलनेत ७० ते १०० रुपयाची घट आलेली असून सोयाबीनचा बाजारभाव ३९०० ते ४१०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरासरी ४००० रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे. मराठवाड्यातील उदगीरमध्ये सोयाबीनला ३६०० ते ३९०० रूपयांचा दर भेटला असून सरासरी ३८०० रुपयाचा दर मिळाला आहे. सोयाबीन चे राज्यातील महत्वाचे मार्केट अकोला येथे आज ३८०० रुपयाचा भाव मिळाला. (४ मे पासून २१ मे पर्यंत १०० ते १२० रुपयाची घट)

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !
सोयाबीन मार्केट : ४ मे २०२० ते २१ मे २०२० (अकोला) source :NCDEX (अकोला २२ मे चा दर : ३८००)

तूर: तुरीचे दरामधील तेजी कायम असून वाशिम मध्ये (आवक -६०० क्विंटल ) ५००० ते ५३२० रुपयाचा दर भेटला असून ५२०० रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. त्याचप्रमाणे कारंजामध्ये तुरीचे दर राहिले आहे. (आवक :१२४ क्विंटल) मध्ये ४८०० ते ५०९० रुपयांचा दर तुरीला मिळाला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

हळद : हळदी साठी हिंगोली-खाणेगावनाका (आवक ११२ क्विंटल) येथे ४६०० ते ४८०० रुपयाचा दर मिळालं आहे. तर ताडकळस येथे ४६०० रुपयांचा सरासरी दर मिळाला आहे. मका : औरंगाबाद मार्केटमध्ये (अवाक ११७ क्विंटल ) मक्याच्या बाबाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ते ४० रुपयाची घट झाली आहे. मक्याला औरंगाबादमध्ये ९०० ते ११०० रुपयाचा दर भेटला असून सरासरी दर १०८५ रुपयाचा मिळाला आहे. भोकरदन मार्केट मध्ये (आवक: ११० क्विंटल) मक्यला ८९१ ते ११०० रुपयाचा दर मिळाला आहे

देशातील कांदा आणि बटाटा याचे बाजारभाव :

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App