बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम : आज २६ मे रोजी, राज्यातील महत्वाच्या शेतीमालाचे बाजारभाव खालील चार्टमधील दर्शविल्या प्रमाणे. कांदा : नाशिक जिल्हातील लासलगावसह महत्वाच्या मार्केटमध्ये कांद्याची आवकेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली आहे.लासलगाव (आवक : १५२०० क्विंटल ) कालच्या तुलनेत क्विंटल मागे ७० ते ८० रुपयाची घट क्विंटल मागे झाली आहे. लासलगावमध्ये कांद्याला ४०० ते ९८० रुपयांचा बाजारभाव भेटत असून ७५० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. कळवण मार्केटमध्ये (आवक: १२१५० क्विंटल ) कांदयाला ४०० ते १०५० रुपयाचा प्रतवारी नुसार दर भेटला असून ८०१ रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत ५० ते ६० रुपयाची वाढ झाली आहे. उमराणे मार्केटमध्ये कांद्याला ४०० ते ९७० रुपयांचा भाव आज भेटला आहे (आवक : १६००० क्विटल), मनमाड मार्केट ( आवक:६१०० क्विंटल ) ३०० ते ८०० रु. चा दर भेटला आहे .

टोमॅटो : टोमॅटो च्या दरात पनवेल, कोल्हापूर आणि मुबई मधील चांगली वाढ टिकून आहे. पनवेल मध्ये आज ६५७ क्विंटल टोमॅटो मार्केट मध्ये दाखल झालेला होता. पनवेल मार्केट मध्ये १८०० ते २००० रुपयाचा दर भेटला आहे. सरासरी १९०० रुपयाचा दर मिळाला आहे. तर शेजारी वाशी अर्केट मध्ये ४०३ क्विंटल टोमॅटो विक्री साठी आलेला होता. वाशी मध्ये ८०० ते १६०० रुपयाचा दर टोमॅटो ला भेटला आहे, सरासरी १४०० रुपयाचा दर वाशी मध्ये भेटला आहे. कोल्हापूर मध्ये ५०० ते १००० रुपयांच्या दरम्यान दर राहिला आहे (आवक : ६४२ क्विंटल). वडगाव पेठ येथे ६०० ते १००० रुपयाचा दर टोमॅटो ला भेटला असून १३० क्विंटल टोमॅटो विक्री साठी आलेला होता.

वाचा:  वायदा-बाजार अपडेट १ जुलै २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

कापूस : कपाशीला राज्यात ५२३० ते ५३५० रुपयाचा दर मिळाला असून राज्यतील भाव स्थिर आहेत. अकेला बोलगावमंजू येथे २६५ क्विंटल कापसाची आवक झाली होती. तर दर ५३५० रुपयांचा राहिला. पैठण येथे आवक १५०२ राहिली तर, दर ५३५० रुपयांच्या दरम्यान राहिला. सवनेर मध्ये २८०० क्विंटल कपाशी विक्री साठी आलेली होती. ४३५५ ते ५३५५ चा दर भेटला आहे. तर सरासरी दर ४३७५ रुपयाचा भेटला आहे.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

सोयाबीन : सोयाबीनला अकोला मध्ये २९०० ते ३५५० रू दर राहिला असून सरासरी दर ३४५० रुपयाचा भेटला आहे. अकोल्यात २५५८ क्विंटल सोयाबीन विक्री साठी दाखल झालेला होता. उदगीर येथे सोयाबीनला ३३०० ते ३६६० रुपयाचा दरम्यान दर राहिला असून ३६६१ क्विंटल सोयाबीनची आवक होती. अमरावती येथे ८१६ क्विंटल आवक आलेली होती तर दर ३२०० ते ३४४० रुपयांचा राहिला. मेहकर मार्केट मध्ये १९७० क्विंटल आवक आलेली होती तर दर ३४०० ते ३८६० रुपयांचा राहिला .

तूर: तुरीच्या दरात अकोला मध्ये (आवक २४२१ क्विंटल) येथे तुरीच्या दरात सुधारणा झाली असून दर ४९०० ते ५२५० रुपयाचा दर मिळाला. नांदगाव खांडेश्वर ला ९९७ क्विंटल आवकआली तर दर ४७५० ते ५१५० रुपयाचा दर मिळाला. मका: जालना येथे २७६८ क्विंटल आवक आली होती तर दर ९०० ते १२७० रुप्याच्या दरम्यान राहिला. सरासरी ११३० रुपयाचा दर भेटला आहे. तर कळवण मध्ये मक्याला ११७५ ते १३२१ रुपयाचा दर मिळाला असून सरासरी १२९१ रुपयाचा दर राहिला. कळावं मार्केट मध्ये २५० क्विंटल मक्याची आवक झालेली होती. हळद : हळदी साठी भोकर मार्केट मध्ये ३८०० ते ४८८५ रुपयांचा दर मिळाला असून (आवक २५६ )सरासरी ४०४५ रुपये बाजार भाव राहिला आहे. हिंगोली कानेगाव नाका मार्केट मध्ये हळदी ला ४३०० ते ४८०० रु चा दर भेटला (आवक : १६० क्विंटल )

वाचा:  वायदा-बाजार अपडेट २९ जून २०२० : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार

देशातील कांदा , टोमॅटो आणि बटाटा मार्केट रेट :

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App