बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

Smiley face 3 min

ई-ग्राम : राज्यातील महत्वाच्या शेतमालचे बाजारभाव खालील दिलेल्या चार्ट प्रमाणे: टोमॅटो : आज रायगड जिल्ह्यातील पनवेल (आवक : ५३४ क्विन्टल) मार्केट मध्ये टोमॅटोच्या दरामध्ये कालच्या तुलनेत किरकोळ घट झाली असून टोमॅटोचे दर १३०० ते १६०० रुपयांच्या दरम्यान झाले असून सरासरी १५०० रु चा दर मिळाला. कोल्हापुर मार्केटमध्ये (आवक : ५४६ क्विंटल) दर कालच्या तुलनेत वाढले झाले असून ९०० ते १५०० रुपयांवर बाजारभाव पोचले आहेत. सरासरी १००० रुपये प्रति क्विंटल चा दर टोंमॅटो ला कोल्हापूर मध्ये भेटला.

कांदा : कळवण मार्केटमध्ये (आवक: ५३००क्विंटल) आज कांद्याच्या दरामध्ये किरकोळ वाढ झाली असून कालच्या तुलनेत क्विंटल मागे ३० ते ४० रुपयाची वाढ झाली आहे. कळवनमध्ये कांद्याला ४०० ते ९११ रुपयांचा बाजारभाव भेटत असून ७०० रुपयांचा सरासरी दर भेटला आहे. लासलगाव मार्केट मध्ये (आवक: ८००० क्विंटल ) कांदयाला ४०० ते ९२५ रुपयाचा प्रतवारी नुसार दर भेटला असून ६५० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे. मागील आठव्याच्या तुलनेत १००-२०० रुपयाची वाढ लासलगाव मार्केट मध्ये झाली.

वाचा:  वायदाबाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

कापूस : कापसाचे दर महत्वाच्या मार्केटमध्ये स्थिर असून ५३५० रुपयाचा सरासरी दर भेटला आहे . मराठवाड्यातील पैठण मध्ये (आवक १५३३ ) ५३५० रुपयाचा दर मिळाला आहे. विदर्भातील हिंगणघाट (आवक ४५०० (२१ मे २०२०)) येथे कापसाला २८०० ते ५३५५ रुपयाचा दर प्रत वारी नुसार भेटला आहे. सरासरी ४२०० रुपयांचा दर कापसाला हिंगणघाट येथे मिळला आहे.

सोयाबीन : वाशिम अंशींग (आवक- १००० क्विंटल ) सोयाबीनच्या बाजारभावात कालच्या तुलनेत ८० ते १०० रुपयाची वाढ झालेली असून सोयाबीनचा बाजारभाव ३९०० ते ४१०० रुपयांच्या दरम्यान आहे. सरासरी ४००० रुपयाचा बाजारभाव मिळाला आहे. मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे सोयाबीनला ३३०० ते ३५६१ रूपयांचा दर भेटला असून सरासरी ३४५० रुपयाचा दर मिळाला आहे. सोयाबीनचे राज्यातील महत्वाचे मार्केट अकोला येथे आज ३६७०(३५००) रुपयाचा भाव मिळाला. (४ मे पासून २१ मे पर्यंत २०० ते ३०० रुपयाची घट झालेली आहे)

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

तूर: तुरीचे बाजारभाव ४५०० ते ५३५० रुपया दरम्यान स्थिर असून असून वाशिम मध्ये (आवक -६०० क्विंटल ) ५००० ते ५३५० रुपयाचा दर भेटला असून ५२०० रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. त्याचप्रमाणे धुधणी मार्केटमध्ये तुरीचे दर राहिले आहे. (आवक :१२४ क्विंटल) मध्ये ४९०० ते ५२७० रुपयांचा दर तुरीला मिळाला आहे. सरासरी दर ५००० रुपये.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा ,बटाटा , टोमॅटो, कापूस , सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

हळद : हळदी वाशीम अनसिंग मध्ये (आवक ११२ क्विंटल) येथे ४५०० ते ४७०० रुपयाचा दर मिळालं आहे. तर मोर्शी येथे ५१०० रुपयांचा कमल दर मिळाला असून, सरासरी ४५३५ रुपयाचा दर मिळला आहे. मका : औरंगाबाद मार्केटमध्ये (अवाक १०१ क्विंटल ) मक्याच्या बाबाजारात कालच्या तुलनेत ५० ते ७५ रुपयाची वाढ झाली आहे. मक्याला औरंगाबादमध्ये ९०० ते ११५० रुपयाचा दर भेटला असून सरासरी दर १०५० रुपयाचा दर मिळाला आहे. भोकरदन मार्केट मध्ये (आवक: ६० क्विंटल) मक्यला ८९१ ते ११०० रुपयाचा दर मिळाला आहे. जालना येथे ३३४६ क्विंटल मक्याची आवक झाली असून ८०० ते १२६१ रुपयाचा दर मिळाला आहे. गेल्या बाजारच्या तुलनेत आह २० रुपयाची वाढ जालना येथे झाली

देशातील कांदा आणि बटाटा याचे बाजारभाव :

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App