मान्सून केरळात दाखल !

Smiley face < 1 min

ई ग्राम : मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवली जात असताना मान्सून ठरलेल्या वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार (Skymet) दक्षिण पश्चिम मान्सून यावर्षी ३० मे रोजीच केरळमध्ये दाखल झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून ८ दिवस आधीच केरळमध्ये पोहोचला आहे.

देशात मान्सून १ जूनपर्यंत पोहोचेल, असा हवामान विभागातर्फे अंदाज वर्तवला होता. मात्र मान्सून १ जूनपूर्वीच दाखल झाला. 2 ते 4 जून दरम्यान मुंबई व उपनगरामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, अरबी समुद्र आणि लक्षद्वीपच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात रविवार सकाळपासून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. ३१ मेच्या दुपारपर्यंत अशीच परिस्थिती होती. पुढचे २४ तास अरबी समुद्राच्या दक्षिण आणि मध्यपूर्व भागात ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App