१६ मे पर्यंत मान्सून अंदमानात ! महाराष्ट्रात या तारखेला येणार

Smiley face < 1 min

ई ग्राम : मोसमी पावसाच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने मान्सून १६ मे पर्यंत अंदमान, निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागावर दाखल होऊ शकतो. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरवर्षी २० मे रोजी अंदमानात धडकणारा मान्सून यंदा १६ मेपर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.

आपल्याकडे सर्वसाधारणपणे केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. एक जूनला केरळमध्ये जर मान्सून उशिरा दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळापत्रक बदलतं. मान्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर पाच दिवसानंतर श्रीलंकेकडे रवाना होतो आणि आठवडाभरानंतर केरळमध्ये धडकतो.

वाचा:  अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणारच; राज्यपालांनी फिरवला मुख्यमंत्र्यांचा आदेश

गेल्या काही वर्षांपासून मान्सूनच्या आगमन आणि समापनचा कालावधी बदलला आहे. यामध्ये एक आठवड्याचे अंतर निर्णाण झालं आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार, यंदा देशात मान्सूनचे आगमन उशीरा होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून मुंबईमध्ये दाखल होईल. ११ जून पर्यंत मान्सून मुंबईमध्ये धडक देऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App