केंद्र सरकारच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी आणि लघु-मध्यम उद्योगांसाठी मोठे निर्णय; कोणते ते पाहा

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम : आज केंद्रीय मंत्रीमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी, लघु-मध्यम उद्योग, हातगाडी यांच्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित होते.

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग आणि शेती विषयक निर्णय घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे. उद्योगातील विविध योजनांसाठी तीन लाख कोटी, तर २० हजार कोटींच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे.

वाचा:  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे; भाजपाची मागणी

केंद्रीय पत्रकार परिषदेतील घोषणा
१) सुक्ष्म आणि लघु मध्यम उद्योगातील योजनांसाठी तीन लाख कोटी, तर २० हजार कोटींच्या कर्जाची तरतूद.
२) १४ खरीप पिकांची आधारभूत किंमत ५० ते ५३ टक्क्यांनी वाढवली. यात मक्याची आधारभूत किंमत ५३ टक्क्यांनी तर मूग आणि तुरीची किंमत ५८ टक्क्यांनी वाढवली आहे.
३) फेरीवाल्यांना १० दहा हजार रुपयाचं कर्ज देण्यात येणार आहे.
४) पीककर्ज फेडण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट पर्यत असणार आहे.

वाचा:  सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून दखल; पोलिसांना कारवाईचे आदेश

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App