ई ग्राम : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन यामुळे शाळा प्रत्यक्ष उघडता आल्या नाहीत, तर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुममध्ये सामावून घेण्यासाठी प्रणाली विकसित करावी लागेल, त्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
‘कोरोना’च्या प्रादुर्भावानंतर शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतला. शाळा सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु राहण्यासाठी तज्ञांशी चर्चा करुन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले
विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चार भिंतीतील शाळा सुरु होऊ शकली नाही, तर ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यांयाचा विचार करावाच लागेल. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरुम्स पर्याय वापरता येईल असे मुख्यमंत्री म्हणाले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.