राजकारण इतके प्रिय झालं की कोरोनालाही विसरले;’ हा’ फोटो ट्वीट करत आदित्य ठाकरेंची टीका

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना विरोधातील युद्धात सरकार, प्रशासन, डॉक्टर, पोलीस सर्व एकसंघपणे लढत असताना भाजपकडून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. अशी टिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकौंट वरून एक फोटो ट्विट करत आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा फोटो ट्विट करून आदित्य ठाकरे यांनी ‘सत्तेच्या लालसेपोटी नेते लहान मुलांना उन्हात उभं करू शकतात, राजकारण इतके प्रिय झालं की कोरोनालाही विसरले’ अशा शब्दात भाजपवर निशाणा साधला आहे.

वाचा:  श्री क्षेत्र निमगाव ग्रामपंचायतीने केली तपासणी यंत्रसामग्री खरेदी !

भाजपनं ‘माझं अंगण रणांगण’ आंदोलन सुरू केलं. या आंदोलनातील एक फोटो पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केला. या फोटोत लहान मुले हातात भाजपचा झेंडा घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App