चांगल्या गुणवत्तेच्या दुधासाठी प्रमाणीकरण, पाश्चरीकरण प्रक्रिया

ई ग्राम : दूध संकलित झाल्यानंतर, ज्या ठिकाणी शीतकरण केंद्र आहे तेथे थंड करून ठेवण्यात येते त्यानंतर ते जिल्हा स्तरावरील शासकीय दूध योजनेत पाठविण्यात येते. येथे आल्यावर त्याची प्राथमिक गुणवत्ता तपासणी करून त्यावर काही सामान्य प्रक्रिया केल्या जातात. त्यातील प्रमुख अशा पाश्चरीकरण, प्रमाणीकरण आणि होमोजीनायझेन या आहेत.

संकलित केलेल्या दुधावर पाश्चरीकरण, प्रमाणीकरण आणि होमोजीनायझेन प्रक्रिया करण्यासाठी तशा प्रकारची यंत्रसामग्री असावी लागते. होमोजीनायझेन प्रक्रिया काही मोठ्या शहराच्या दूध पुरवठ्यासाठी केली जाते. प्रमाणीकरण ही प्रक्रिया मात्र सर्वच शासकीय दूध योजनेमार्फत केली जाते

प्रमाणीकरण प्रक्रिया
बाजारामध्ये विक्री होणाऱ्या दुधामध्ये बहुतेक गाय किंवा म्हशीचे दूध आढळते. या दुधामध्ये घृतांशाचे प्रमाण विविध आढळते. गाईच्या दुधात ३.० पासून ५.५ टक्क्यांपर्यंत तर म्हशीच्या दुधात ६.० पासून १०.० टक्क्यापर्यंत घृतांशाचे प्रमाण कायम ठेवलेले असते. उदाहरणात, ते ४ किंवा ४.५ टक्के ठेवतात. अशा प्रकारच्या दुधास ‘प्रमाणित दूध’ म्हणतात.
प्रमाणित दूध म्हणजे ज्यामध्ये घृतांश व घृतांश विरहित घटकाचे प्रमाण अनुक्रमे ४.५ टक्के व ८.५ टक्के ठेवलेले असते. यामुळे दुधाची प्रत कायमसारखी ठेवली जाते आणि उर्वरित घृतांशाचा उपयोग तूप व लोणी बनवण्यासाठी केला जातो. तसेच मागणी आणि उत्पादन याचा समतोल राखण्यासाठी उपयोग करता येतो.
आपल्या देशात विकल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या दुधासाठी विशिष्ट घृतांश व घृतांश विरहित घन पदार्थाचे प्रमाण ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. उदाहरणात, जेव्हा गाईचे दूध विक्रीसाठी आणले जाते तेव्हा त्यामधे कमीत कमी ३.५ टक्के घृतांश (महाराष्ट्र ४.० टक्के ) तर घृतांश विरहित घन पदार्थाचे प्रमाण ८.५ टक्के असायला हवे.
व्यावहारिकदृष्ट्या सगळ्याच गाईच्या किंवा म्हशीच्या दुधात हे प्रमाण स्थिर राहू शकत नाही. काहीमधे हे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते. असे दूध तसेच्या तसेच विकले तर ग्राहकांना मिळणारे दूध हे समान प्रतीचे असणार नाही यासाठी त्याचे निश्चीत प्रमाणीकरण करणे गरजेचे ठरते. हे प्रमाणीकरण खालीलप्रमाणे करण्यात येते. कमी घृतांशाच्या दुधात मलई मिसळून
दुधात मलई विरहित दूध मिसळून मलई व मलई विरहित दुधाचे योग्य प्रमाणात मिश्रण करून ही प्रक्रिया पिअरसन चौकोन पद्धतीचा वापर करून करतात.

वाचा :   का म्हणतात शेळीला गरीबाची गाय ?

पाश्चरीकरण
दुधाचे पाश्चरीकरण म्हणजे दुधावर उष्णतेची प्रक्रिया करणे. यामध्ये एकतर दुधास ६३ अंश सेल्सिअस (१४५ अंश फॅरनहाइट) तापमानावर ३० मिनिटांसाठी अथवा ७२ अंश सेल्सिअस (१६१ अंश फॅरनहाइट) तापमानावर १५ सेकंदासाठी तापविले जाते व नंतर तत्काळ ५ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड करून साठवून किंवा विक्री करण्यात येते. या प्रक्रियेस दुधाचे ‘पाश्चरीकरण करणे’ म्हणतात.

वाचा :   जेजुरीच्या महाविद्यालयात अन्नप्रक्रिया उद्योग मार्गदर्शन

पाश्चरीकरण प्रक्रियेचा उद्देश
-दुधात असणारे सर्व प्रकारचे जिवाणू नष्ट होतात.
-दुधातील जिवाणू नष्ट पावल्यामुळे साठवणक्षमता म्हणजे दूध टिकून राहण्याची क्षमता वाढते. दूध लवकर नासत नाही.
-दुधाचे पाश्चरीकरण हे परिपूर्ण झाले आहे का नाही यासाठी दोन चाचण्या आहेत. दुधातील मायको बॅक्टोरीयम ट्यूबरक्युलॉंसीस जिवाणू नष्ट झालेला असावा. दुधात असणारा फॉसस्फेटेज एन्झाईम नष्ट किंवा अकार्यक्षम झालेली असावी. या चाचण्या प्रयोगशाळेत करता येतात.

पाश्चरीकरणाच्या विविध पद्धती
१)बॉटल पाश्चरीकरण २) बँच किंवा होल्डिंग पाश्चरीकरण ३) जास्त तापमान कमी अवधी पद्धत (HTST) पाश्चरीकरण यांपैकी सर्व दुग्धशाळेत तिसरी पद्धत सामान्यपणे वापरली जाते.

पाश्चरीकरणाची जास्त तापमान कमी अवधी पद्धत (HTST)
या पद्धतीचा उपयोग १९२२ मध्ये इंग्लंडमध्ये करण्यात आला. या पद्धतीमध्ये दुधाची सतत धार पाइपद्वारे पाश्चरीकरण यंत्रात पाठवली जाते. जेथे या दुधास ७२ अंश सेल्सिअस तापमानापर्यंत थंड केले जाते. म्हणून दुधाचा साठा कितीही लिटर असला तरी अल्पावधीत पाश्चरीकरण क्रिया करता येते.-या पद्धतीसाठी जी यंत्रसामग्री लागते त्यासाठी जागा कमी लागते. यंत्राची ताशी क्षमता वाढविण्यासाठी जास्तीच्या प्लेटस त्याच यंत्रास जोडता येतात.
-दुधाची आवक, पाश्चरीकरण होताच दूध बॉटल किंवा पिशव्या भरण्याच्या यंत्राकडे पाइपमधून पाठवता येते. इतर यंत्राच्या तुलनेत किंमत कमी असते.
-दूध हाताळताना होणारे तोटे कमी होतात म्हणून दुधात घट येत नाही. संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित असल्यामुळे दुधाचे पाश्चरीकरण योग्यरीत्या झालेले नसेल तर एफ.डी.व्ही. व्हॉल्व्हद्वारा दूध परत पाश्चरीकरणासाठी यंत्रानेमार्फतच पाठविले जाते म्हणून या दुधाच्या पाश्चरीकरण चाचण्या करण्याची आवश्यकता भासत नाही.
-या यंत्राची साफ सफाई किंवा धुण्याची क्रिया जागेवरच करता येते. म्हणून पाश्चरीकरणाची ही पद्धत प्रचलित आहे.
-या व्यतिरिक्त आजकाल यू. एच. टी. पाश्चरीकरण पद्धतही वापरात येत आहे. ही पद्धती १९५० मध्ये विकसित झाली असून यामध्ये दूध १३५ ते १५० अंश सेल्सिअस तापमानावर अत्यंत अल्पावधीसाठी प्रक्रिया केले जाते.

वाचा :   का म्हणतात शेळीला गरीबाची गाय ?

महेशकुमार कदम, शशिकिरण हिंगाडे

Read Previous

फळबाग नुकसानाची मदत मिळणार तरी कधी?

Read Next

शेतकऱ्यांना कार्यालयांमध्ये उतारे घेऊन जाण्याची गरज नाही – महसूलमंत्री