रोहयोतील गैरप्रकारप्रकरणी सीईओंकडे तक्रार

ई ग्राम , यवतमाळ (प्रतिनिधी) : रोजगार हमी योजने अंतर्गंत वाटप करण्यात येत असलेल्या विहिरी तसेच गोठ्यांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. या खाबुगिरीमुळे शेतकरी त्रस्त झाल्याची तक्रार यवतमाळ पंचयात समितीच्या सभापती उज्वला गावंडे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

शासनाच्या अनेक योजनांची अंमलबजावणी पंचायत समिती मार्फत केली जाते. सद्या रोजगार हमी योजने अंतर्गंत विहिरी तसेच गोठ्यांचे वाटप केले जात आहे. यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी अर्ज करीत आहेत. पंचायत समितीचे कर्मचरी मात्र शेतकऱ्यांना योजनांचा लाभ न देता त्यांचया कागदपत्रांमध्ये त्रुट्या काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्याने पैसे दिले, त्याची त्रुटी दुरुस्त करुन घेतली जात आहे. ज्यांनी पैसे दिले नाही त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.

या संदर्भात उज्वला गावंडे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांची भेट घेली असता त्यांनी सुध्दा उडवाउडवीची उत्तरे दिली, असा आरोप आहे. या सर्व गैरप्रकारात त्यांचा हस्तक्षेप असल्याची शंकाही यावरुन त्यांनी व्यक्‍त केली आहे. विशेष म्हणजे प्रतीक्षा यादीनुसार विहिरी तसेच गोठ्याची कामे होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. यवतमाळ जिल्हयात सिंचनाचे क्षेत्र कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी संकटांचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याची दखल घेत याप्रकरणी चौकशी करीत शेतकऱ्यांना दिलासा दयावा, अशी मागणी उज्वला गावंडे यांची आहे.
वाचा :   पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या हालचाली सुरु
Read Previous

उद्योगवाढीसाठी जागतिक कडधान्य महासंघाचे भारताला सहकार्य – ब्राऊन

Read Next

‘नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहता कामा नये’