बारामतीत वकील-पोलिसांच्यात तुफान हाणामारी

Smiley face < 1 min

ई ग्राम टीम : बारामती काल संध्याकाळी एका वकिलासह प्रशांत सातव आणि अन्य कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या आरोपींना न्यायालयीन कामासाठी कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी एक पोलीस कर्मचारी व्हिडिओ शूटिंग करत असल्यामुळे त्याला वकिलांनी शूटिंग करण्यास मज्जाव करण्यात आला. यावेळी पोलीस आणि वकील यांच्यात आरे तुरेची भाषा झाली. यातूनच मोठ्या प्रमाणत गोंधळ निर्माण झाला आणि पोलीस व वकील यांच्यात हाणामारी झाली.

वाचा:  ‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस सर्वेक्षण करणार

पोलीस आणि वकील यांच्यात आरे तुरेचा वाद सुरू झाला आहे. ही बाब DYSP नारायण शिरगावकर यांना समजताच ते न्यायालयाच्या आवारात हजर झाले. यावेळी वकील राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांची शिरगावकर यांना सदर बाब लक्षात आणून देत असताना चर्चेची पातळी घसरली आणि दोघांच्यात शिवीगाळ झाली.

दरम्यान, या झालेल्या बाचाबाची नंतर त्याच पर्यावसन हाणामारी मध्ये झालं आणि दोन्ही बाजूने तुफान मारामारी झाली. यात D.Y.S.P नारायण शिरगावकर यांच्यासह उपस्थित पोलिसांना वकिलांकडून मारहाण झाली तसेच, स्व रक्षणासाठी पोलिसांनाही लाठीचार्ज करावा लागला.

वाचा:  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात यंदा ‘हा’ मेळा

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App