एकत्र येऊन लढण्याची गरज असताना भाजपवाले स्टंट करत आहेत

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यात विरोधी पक्षनेते जबाबदारीने वागत नाहीत. सध्या वेळ कोणती आहे आणि आपण काय करतोय याच भान भाजपला नाही. त्यामुळेच आंदोलन करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे आज कोरोनाच्या विरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज असताना भाजपवाले स्टंट करत आहेत. अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

आज भाजपने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे पत्र कार्यकर्त्यांना पाठवले आहे. याबाबत शेट्टी म्हणाले, मी आजवर अनेक वर्षे विरोधी पक्षात काम केले आहे. पण संकटाच्या काळात मात्र त्या त्या सरकारशी संवाद ठेवला. जेव्हा आघाडीचे सरकार सत्तेत होते तेव्हा सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. तेव्हा आम्ही राजकारण करत बसलो नाही. तर सरकारला साथ देण्याची भूमिका पार पाडली.

वाचा:  देशातील कोरोनारुग्णांचा आकडा दीड लाखाच्या पार, राज्यात सर्वाधिक रुग्ण

सध्याच्या परिस्थितीत भाजप नेत्यांना राजकारण करायच आहे. त्यामुळे ते आंदोलन करण्याची भाषा करत आहेत. परंतु अस करण्याची आजची वेळ आहे का आली? असा सवाल शेट्टी यांनी विचारला आहे. आपल्यावर कोणता प्रसंग ओढवला आहे आणि हे कसे वागत आहेत. एवढा बेजबाबदारपणा बरा नाही. असे शेट्टी म्हणाले

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App