शेतकऱ्याने मत्स्यशेतीतून शोधला समृद्ध होण्याचा मार्ग

Smiley face < 1 min

उमरगा : शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी मत्स्यव्यवसाय करतात. मत्स्य शेतीतुन उत्पन्न मिळवण्याचा आणि समृद्ध होण्याचा मार्ग (ता.कोराळ) येथील एका शेतकऱ्याने शोधला आहे. यासाठी मागेल त्याला शेततळे याचा त्यांनी लाभ घेतला आणि त्यात त्यांनी मत्स्य बीज सोडले. या पहिल्याच प्रयत्नात त्यांना दीड ते दोन लाख रुपयांचा आर्थिक फायदा होईल, असे अपेक्षित आहे.

वाचा:  कोरोना विरुद्ध लढ्यासाठी ४ हजार डॉक्टर उपलब्ध होणार

कोराळ येथील प्रयोगशील शेतकरी परमेश्वर जाधव हे आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करतात. तालुका कृषी कार्यालयाच्या मागेल त्याला शेततळे योजनेचा लाभ घेऊन ३० बाय २५ फूट आकाराच्या शेततळ्याची उभारणी केली. याचा फायदा त्यांना दोन कामासाठी झाला शेतीला पाणी पण झाले आणि उत्त्पन्न मिळवण्याचे साधन ही झाले. ही उभारणी केल्यानंतर त्यांनी यात ६ महिन्यांपूर्वी विविध माश्यांचे बीज टाकले. यासाठी त्यांना साडे सहा हजार रुपये खर्च आला.

वाचा:  पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कठोर कारवाई करा : दादाजी भुसे

दरम्यान, या टाकण्यात आलेल्या माश्याच्या बीजामध्ये कटला, रोहू, सुपरनेस अशा माश्यांच्या प्रजाती आहेत. बीज टाकून सहा महिने झाल्यानंतर त्यांचे वजन पावशेर ते १ किलो झाले आहे. या माशांची मागणी आता व्यापारी करू लागली आहेत. साधारणत: शंभर रुपये प्रतिकिलो दर अपेक्षित आहे, व्यापाऱ्यांनी ८० रुपयांप्रमाणे मागणी केली आहे. साधारणतः दोन ते अडीच टन माशांचे उत्पन्न होईल, असे अपेक्षित आहे.

वाचा:  राहुल गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले…

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App