लॉकडाऊन नंतर दुग्धव्यवसायातील नवीन संधी निर्माण होणार

Smiley face < 1 min

ई ग्राम : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमुळे शेतीक्षेत्रात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ॲग्रोवनच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हचा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे . या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून रोज रात्री ७ वाजता वेगवेगळ्या विषयातील तज्ञ शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.

त्याअंतर्गत दि. २२ एप्रिल रोजी कोरोनानंतर डेअरी व्यवसायातील संधी या विषयावर डॉ. दिनेश भोसले यांनी काल रात्री ७ वाजता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जवळपास एक लाख लोकांनां या मार्गदर्शनाचा फायदा झाला आहे. या लाईव्हद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या आणि त्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संपूर्ण राज्यातून रोज प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

वाचा:  ग्रामविकास विभागामार्फत महाराष्ट्रभर मोफत आर्सेनिक अल्बम-३० औषध पुरविणार
आपल्याशी संवाद साधत आहेत. डॉ. दिनेश भोसले विषय – कोरोनानंतर डेअरी व्यवसायातील संधी

आपल्याशी संवाद साधत आहेत. डॉ. दिनेश भोसले विषय – कोरोनानंतर डेअरी व्यवसायातील संधी

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई बुधवार, 22 अप्रैल 2020

आपल्या मार्गदर्शनात डॉ. भोसले यांनी लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या दुग्धव्यवसायातील परिणामांवर प्रकाश टाकला. पण त्याचवेळी या परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नव्या संधी बद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. डॉ. दिनेश भोसले यांनी दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात. या बरोबर चांगल्या प्रतीच्या दुधासाठी जनावरांना चारा काय द्यायला हवा. याची माहिती दिली.

वाचा:  अखेर मरकजच्या कार्यक्रमामधील चूक शहांनी केलीच कबूल

लॉकडाऊन नंतर दुध उत्पादकांना चांगला भाव मिळेल. अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली. त्याबरोबर शेतकऱ्यांच्या दुधभावासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतीक्षेत्राशी संबंधीत तज्ञांचे फेसबूक लाईव्हद्वारे मार्गदर्शन देण्याचा अभिनव उपक्रम ॲग्रोवनने सुरू केला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. ह्या संवादात सहभागी होण्यासाठी दररोज रात्री ७ वाजता या लिंकवर https://www.facebook.com/AGROWON/ क्लिक करा. किंवा ॲग्रोवनच्या फेसबूक पेजला भेट द्या.

वाचा:  १ जून पासून बदलतायेत रेशन कार्ड संदर्भातील अनेक नियम, जाणून घ्या तुमच्यावर काय होईल परिणाम

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App