देशातील कोरोनारुग्णांचा आकडा दीड लाखाच्या पार, राज्यात सर्वाधिक रुग्ण

Smiley face < 1 min

ई ग्राम : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दीड लाखाच्या पार गेला आहे. देशात मागच्या 24 तासात देशात 6387 रुग्ण आढळले तर 170 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील कोरोनाग्रस्तांचे आकडे जाहीर केले आहेत.

देशात सध्या 83004 अॅक्टिव्ह कोरोनाग्रस्त असून 64425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात एकूण 54,758 रुग्ण असून त्यापैकी 1792 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडू मध्ये 17728 रुग्ण असून 127 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरातमध्ये सध्या 14821 रुग्ण असून 915 जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा:  आरबीआयचे नियंत्रण सहकार मोडीत काढण्यासाठीच : शरद पवार

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App