साखर विषयावर महाराष्ट्रात किती पैसे खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे

Smiley face < 1 min

ई ग्राम : साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे, अशी मागणी करत माजी खासदार निलेश राणे यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली होती. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा:  पेट्रोल, गॅस सिलेंडर, रेशनकार्ड, रेल्वेसंदर्भातील 'हे' नवीन नियम आजपासून लागू

यासंदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये निलेश राणे म्हणाले आहेत कि साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालचं पाहिजे. साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा??,असे म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

वाचा:  वायदा बाजार अपडेट : जाणून घ्या सोयाबीन, हळद आणि चण्याचे वायदे बाजार !

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App