माळेगाव साखर कारखान्यात विषारी वायू गळती; १३ कामगारांवर उपचार सुरू

Smiley face < 1 min

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील कच्ची साखर तयार होणाऱ्या पॅनमध्ये विषारी वायू गळती झाली. गॅस गळती झाल्यामुळे येथे काम करणारे १३ मजूर बेशुद्ध झाले आहेत. त्या सर्व कामगारांवर बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा सगळ्या राज्यात नावाजलेला आहे. आज सकाळी कारखान्याच्या पॅनच्या टाकीत मिथेन हा विषारी गॅस तयार झाला, आणि अचानक गॅस गळती सुरू झाली. गॅसची गळती सुरू झाल्याने येथे काम करणाऱ्या १३ कामगारांना त्याचा त्रास होऊ लागला, आणि ते बेशुद्ध पडले. ही घटना समजल्या बरोबरच या कामगारांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे.

वाचा:  राज्यातील ठाकरे सरकार स्थिर, काँग्रेस-राष्ट्रवादी पाठीशी - शरद पवार

दरम्यान, कारखान्यातील कच्या साखरेवर प्रक्रिया केली जाते. त्या टाकीत चिकट साखर मोकळी होण्यासाठी कामगारांनी काल या पॅन टाकीत पाणी सोडले होते. टाकीत विषारी मिथेन गॅस तयार झाला. आज सकाळी कामगारांनी टाकीच झाकण उघडल्यावर टाकीतून विषारी मिथेन गॅस बाहेर पडला. यावेळी या तेरा कामगारांवर याचा परिणाम होऊन त्यांना चक्कर यायला लागल्यावर त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. यापैकी दोघांची तब्बेत गंभीर असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून समजले आहे.

वाचा:  आपलेच आपल्याला सोडून जाऊ नयेत म्हणून किती वेळा ओरडावे लागते; जितेंद्र आव्हाडांची भाजपवर टीका

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App