ई ग्राम : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं ‘अम्फान सुपर सायक्लोन’ हे चक्रीवादळ बुधवारी अखेर पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ वादळाने थैमान घातले असून यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर कोट्यवधी रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अम्फानचे संकट पाहता खबरदारी म्हणून हवामान खात्याने ओडिशा आणि आसामसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम बंगाल, तामिलनाडू, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी, त्रिपुरा, मिजोरम, मणिपुर आणि जम्मू काश्मीरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
वादळामुळे किनाऱ्यालगत असणारे अनेक घरं जमीनदोस्त झाले आहे. चक्रीवादळ थडकण्याआधीच पश्चिम बंगाल आणि ओडिशातील किनारपट्टीलगतच्या 6 लाख 58 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.