विलास शिंदे यांचे ॲग्रोवनच्या फेसबूक लाईव्हमधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Smiley face 2 min

ई ग्राम : सह्याद्री फार्म या प्रसिद्ध शेतकरी उत्पादक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी काल (ता. १८ एप्रिल) ॲग्रोवनच्या वाचकांशी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकरी उत्पादक कंपन्यांसमोरची आव्हाने व भविष्यातील संधी तसेच कोरोना संकटातनंतरची शेतीसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी या विषयावर त्यांनी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजवरून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. काल रात्री ८ वाजता झालेल्या या लाईव्हला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जवळपास एक लाख लोकांना या मार्गदर्शनाचा फायदा झाला.

या कार्यक्रमाद्वारे त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकल्या आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. शेतकरी कमेंट्सच्या माध्यमातून विविध प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नांना विलास शिंदे तत्काळ उत्तरे देत होते. लॉकडाऊनमुळे आज शेतात मजूर कामाला येत नाही. त्यामुळे माल काढता येत नाही. काढला तर तो विक्रीसाठी बाजारात नेण्यासाठी वाहन नाही, आणि नेलेच तर बाजारात विकला जाईल याची कोणतीही हमी नाही. यामुळे शेतकऱ्यांना हा माल आपल्या डोळ्यांदेखत शेतात तसाच सोडून द्यावा लागत आहे. ह्या मुद्द्यावर लाईव्हमध्ये विशेष चर्चा झाली.

वाचा:  भारताचा WHO ला दणका, 'कोरोना' व्हायरसच्या उपचारासाठी उचलले 'हे' पाऊल

भारताची अर्थव्यवस्था आज जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. जागतिकीकरनाचे जे फायदे ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहचायला पाहिजे होते ते आजही पोहचू शकलेले नाहीत. औद्योगिकरणानंतर जे ३०० वर्षांत जे जग घडलं ते जग परत एकदा त्या पुनर्रचनेच्या दिशेने जाणार आहे. पुढील दोन वर्ष तरी हे कोरोनाच संकट आपल्या भोवती घोंगवणार आहे. अशी मांडणी त्यांनी केली.

वाचा:  'म' मराठीचा, सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा अनिवार्यच; राज्य सरकारचा आदेश जारी!

आपल्याशी संवाद साधत आहेत मा. विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक – सह्याद्री फार्म नाशिकविषय – कोरोना संकटानंतरचे शेती क्षेत्र : आव्हाने व संधी #agrowon #VilasShinde #FBlive

Agrowon – Mitra Global Shivaracha द्वारा इस दिन पोस्ट की गई शनिवार, 18 अप्रैल 2020

भारत सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला त्या वेळी ९ महिने पुरेल इतका अन्नाचा साठा आपल्या जवळ आहे असे सांगितले होते. त्याचबरोबर जे रब्बी हंगामातील नवीन पीक येत आहे ते धरून भारतातील सर्व लोकांना पुरेल इतका साठा आपल्याकडे आहे. त्यामुळेच सरकार इतका मोठा निर्णय घेऊ शकले. यामागे आपल्या शेतकऱ्यांचं कर्तृत्व आहे हे सांगण्याचीची गरज नाही. कारण जर अन्नाचा साठाच आपल्याकडे नसता तर लॉकडाऊनचा निर्णय घेणे अवघड झाले असते. अशा शब्दात विलास शिंदे यांनी शेतकऱ्यांचे महत्व अधोरेखीत केले.

वाचा:  मोठी आनंदाची बातमी! पीक कर्ज परतफेडीला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ, परंतु ही आहे अट

या लाईव्हला संपूर्ण राज्यातून शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनीही असे लाईव्ह व्हायला हवेत, याचा खूप फायदा शेतकऱ्यांना होतोय असे म्हणत या उपक्रमाचे कौतूक केले.

शेतीक्षेत्राशी संबंधीत तज्ञांचे फेसबूक लाईव्हद्वारे मार्गदर्शन देण्याचा अभिनव उपक्रम ॲग्रोवनने सुरू केला आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत पुढील सलग १५ दिवस हा उपक्रम सुरू राहणार आहे. ह्या संवादात सहभागी होण्यासाठी दररोज रात्री ८ वाजता या https://www.facebook.com/search/top/?q=agrowon%20-%20mitra%20global%20shivaracha&epa=SEARCH_BOX लिंकवर क्लिक करा. किंवा ॲग्रोवनच्या फेसबूक पेजला भेट द्या.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App