राज्यसभेच्या १८ जागांसाठी १९ जूनला मतदान

Smiley face < 1 min

ई ग्राम : राज्यसभेच्या 18 रिक्त जागांसाठी 19 जूनला निवडणूक होणार आहे. यासंदर्भात सोमवारी निवडणूक आयोगाने घोषणा केली. या जागांसाठी मार्च महिन्यातच मतदान होणार होते. मात्र, कोरोना व्हायरस महामारी आणि देशव्यापी लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर ते टाळण्यात आले. मात्र, आता लॉकडाउनमध्ये मोकळीक दिली जात असल्याने निवडणूक आयोगाने या जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे.

वाचा:  आभाळासोबतच भरपाईकडे लागल्या शेतकऱ्यांच्या नजरा

निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की निवडणुकीची व्यवस्था करताना कोरोनाच्या प्रतिबंधांसंदर्भातील नियमांचे पालन व्हावे, यासाठी मुख्य सचिवांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यास सांगण्यात आले आहे.

गेल्या फब्रुवारी महिन्यात आयोगाने 17 राज्यांत 55 जागा भरण्यासाठी निवडणुकीची घोषणा केली होती. यानंतर मार्च महिन्यात 10 राज्यांत 37 जागा बिनविरोध भरल्या गेल्या. तर आता 18 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

वाचा:  बाजारभाव अपडेट : जाणून घ्या कांदा, टोमॅटो, कापूस, सोयाबीन, मका, हळद आणि तुरीचे बाजारभाव !

ज्या १८ जागांसाठी मतदान होणार आहे, त्यात गुजरात आणि आंध्र प्रदेशातील प्रत्येकी चार जागा असून राजस्थान आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन, झारखंडमधील दोन तर मणिपूर आणि मेघालमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App