शेतीसाठी फायदेशीर ठरणारे गांडूळ खत निर्मिती प्रक्रिया

ई-ग्राम | शेतात चांगले पीक मिळावे आणि भरघोस उत्पादन मिळावे यासाठी जगभरात अनेक प्रयोग झाले आहेत. वैज्ञानिक पातळीवर याचे आणखी प्रयोग सुरुच आहेत. यातून शेतकरी उत्पादन तर घेऊ लागला मात्र अशा खतांमुळे उत्पादनाचा दर्जा ढासळला आहे. पीकांच्या या निकृष्ठेमुळे अनेक प्रकारच्या रोगांचा सामना करावा लागत आहे.

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला अवघा २४ तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळ खतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्रव्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्रव्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.

वाचा :   खरबूज लागवड तंत्रज्ञान

गांडूळ खत कसे तयार करावे ?
सर्वप्रथम धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत, शेण, शिल्लक वैरण, काडीकचरा, पिकांची धसकटे अर्धवट कुजलेला कचरा गोळा करावा. त्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागावर गादी वाफा तयार करावा. खड्डा खोदायची गरज नाही. जमिनीवर सावकाश कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थाचा (पाचट, धसकट इ.) २-३ इंच जाडीचा थर घालावा. त्यामध्ये गांडुळे सोडावीत. नंतर हा गादीवाफा गोणपाटाने झाकून घ्यावा. वाफ्याचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत मर्यादेत ठेवावे. जमीनीचा सामू ६.५ ते ७.५ असणे आवश्यक आहे. तसेच जमीनीत ४५ ते ५० टक्के ओलावा असावा.

वाचा :   खरबूज लागवड तंत्रज्ञान

गांडूळ खत निर्मिती करत असताना घ्यावयाची काळजी…
वाफ्यातील मातीची ढेकळे हाताने फोडावीत व आठवड्यातून एकदा वाफ्यातील कचरा खाली-वर करावा. या पद्धतीने महिना- सव्वा महिन्यात चहाच्या पावडरसारखे खत तयार होते. हे तयार खत वेगळे करावे. तयार झालेले खत काढण्यापूर्वी गांडुळाच्या वाफ्याला आठ दिवस पाणी घालू नये व खताचे छोटे छोटे ढीग तयार करून ठेवावेत म्हणजे गांडुळे तळाशी जातील.

वाचा :   खरबूज लागवड तंत्रज्ञान

गांडूळ खत वेगळे करताना शक्यतो कुदळ, टिकाव व फावडे यांचा वापर करू नये. त्यामुळे गांडुळांना इजा होण्याची दाट शक्यता असते. हळूवार पद्धतीने तयार झालेला गांडूळ खत हाताने वेगळा करावा. तसेच न कुजलेले भाग पून्हा गांडुळांना खायला द्यावा. प्रत्येक शेतकरी स्वतःच्या गरजेइतका गांडूळ खत तयार करू शकतो. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो आणि पीकांची दर्जा वाढतो. परिणामी पौष्टीक अन्न आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचते.

Read Previous

मांगूर माशांवर बंदी!

Read Next

शेतकऱ्यांच्या १३५२ कोटी रुपयांवरील प्रश्नचिन्ह हटले