अरबी समुद्रात धडकणार चक्रीवादळसह मुसळधार पाऊस ?

Smiley face < 1 min

ईा ग्राम : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळास अनुकुल असे वातावरण तयार झाले असून मुसळधार पावसासह चक्री वादळाचा इशारा भारतीय हवामान खात्याने आज दिला आहे. हे चक्रीवादळ प्रामुख्याने किनारपट्टीलगतच्या प्रदेशातून जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे

भारत हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, नैऋत्य अरबी समुद्रावरील चक्रीवादळ अभिसरण आता पश्चिम-मध्य आणि लगतच्या दक्षिण-पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या मध्य-उष्णकटिबंधीय पातळीपर्यंत पसरलेले आहे. त्याच्या प्रभावाखाली असलेल्या प्रदेशातून कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ” हे चक्रीवादळ अरबी समुद्रातून जाणार असून मुबई किंवा महाराष्ट्रातून जाणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही .

वाचा:  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने कर्ज द्यावे; भाजपाची मागणी

दक्षिण पश्चिम किनारपट्टी असलेल्या कर्नाटक, केरळ, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, मुबईसह गुजरातची किनारपट्टीला या वादळाचा फटका बसण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. वादळीवाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा आणि सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर ३१ मे रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.गेल्या एका महिन्यात तीव्र उष्णतेचा समाना करणाऱ्या महराष्ट्र सह कर्नाटक केरळ मध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या काळात आयएमडीने कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 29 अंश सेल्सिअस तापमान असण्याची शक्यता वर्तविली आहे.

वाचा:  जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस; राज्यात २५१.४ मिलिमीटर पावसाची नोंद

हवामानशास्त्र आणि हवामान बदल, स्कायमेट वेदर सर्व्हिसेसचे व्ही.पी. महेश पलावत म्हणाले, “किनार्यावरील कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्याचा प्रभाव राहील. तसेच कोलंबिया विद्यापिठाचे हवामान शास्त्रज्ञ अ‍ॅडम एच. सोबेल यांनीही पुढील आठवड्याच्या सुरूवातीस अरबी समुद्रावर चक्रीवादळाची शक्यता वर्तविली आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App