egram

आम्ही भारतीय ग्राम विकास माहिती प्रणालीमध्ये आमूलाग्र बदलाचे संकेत देतो आहोत. आम्ही प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण ग्राहकांना सेवा पुरविणारी संस्था म्हणून कार्यरत आहोत. आम्ही ३० हुन अधिक कुशल आई. टी . तंत्रज्ञ ,संशोधक , ग्राहक सेवा अधिकारी आणि व्यवस्थापनतंत्रांसोबत कार्यरत आहोत. संस्थेचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. बदलत्या युगात ग्रामव्यवस्थेला उच्च माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळण्यासाठी आम्ही “स्मार्ट व्हिलेज स्मार्ट महाराष्ट्र “अभियान आरंभले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गाव स्मार्ट व्हिलेज बनण्याकरिता आम्ही सर्वोत्तम तंत्रज्ञान , प्रशिक्षण आणि मार्गदर्शन पुरविण्याकरिता कटिबद्ध आहोत.

यासाठी शेतकरी आणि ग्रामीण नागरिकांसाठी डिजिटल ग्रामपंचायत ॲप्लिकेशन सुविधा बनविण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी आजच आमचे ईग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करा

  ई-ग्राम ॲप्लिकेशन डाउनलोड करा                

ग्राम हे ॲप्लिकेशन ग्रामपंचायत,नगरपरिषद साठी बनवले आहे . आपण जर सरपंच,नगराध्यक्ष,सदस्य असाल तर आमच्याशी संपर्क साधा 8856098156

महत्वाचे गुणधर्म /तपशील                     

सरकारी पातळीवरील डिजिटल सेवांचे आकडे पाहून डिजिटल इंडियावर किती मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे, डिजिटल इंडियामध्ये बहुतांशी ग्रामपंचायती अजूनहि ऑफलाईन आहेत. पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असला तरीही ग्रामपंचायती अजूनही डिजिटल झालेल्या नाही. बहुतांशी ग्रामपंचायतींची वेबसाईट मोबाईल ॲप उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख जगाला होताना दिसत नाही ,म्हणूनच आम्ही डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करणाऱ्या दृष्टीने ईग्राम नावाचा उपक्रम हाती घेतला असून ग्रामपंचायतीतील या गोष्टी ॲप द्वारे मिळणार आहे

  • गावातील इतिहास आणि माहिती गावातील ऐतिहासिक स्थळांची मंदिरांची माहिती
  • ग्रामपंचायत बॉडी , ग्रामपंचायत सरपंच , सदस्य व ग्रामसेवकांचे नंबर.
  • डिजिटल टॅक्स सुविधा
  • डिजिटल दाखले विनंती
  • शिक्षण , आरोग्य ,योजना गावातील माहिती . गावातील शाळेची नवे व शिक्षक माहिती, शाळेचा पट, तसेच गावातील वैद्यकीय सुविधा व त्यांची माहिती.
  • फोटो व विडिओ गावातील विकासकामे व इतर गोष्टींचे फोटो
  • मार्केट भाव आपल्या जवळील मार्केट चे बाजारभाव
  • शेतीविषयक नवनवीन बातम्या
  • गावपातळीवरील बातम्या
  • GR शासन निर्णय