गॅस सिलिंडर दरात वाढ ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

Smiley face < 1 min

नवी दिल्ली : सध्या सर्वत्रच महागाईचे चटके बसत आहेत. सर्वसामान्य माणसांना महागाईला मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत असताना गॅस सिलिंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. १४४.५ रुपयांनी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यानी विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. जागतिक बाजारभावात इंधन दराच्या दरात झालेली वाढ ही कारणे तेल कंपन्यानी दिली आहेत. ही दरवाढ आज बुधवार पासून लागू केली जाणार आहे. गेल्या काही दिवसातील मोठी दरवाढ आहे.  

वाचा:  गोपीचंद पडळकरांवर अजित पवार संतापले, म्हणाले...

१ जानेवारी रोजी गॅस सिलिंडरच्या दरामध्ये  १९ रुपयांची वाढ केली होती. गेल्या ऑगस्टपासून एलपीजीच्या दरात दर महिन्याला वाढ केली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. जानेवारी महिन्यापासून विनासबसिडीच्या गॅस सिलेंडर दरात वाढ करण्यात आली नव्हती, अशी माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली आहे. आजच्या दरवाढीनंतर दिल्‍लीतील विना अनुदानित गॅस सिलिंडरचे दर ८५८.५ रुपयांवर गेले आहेत. तर मुंबईतील सिलिंडरचे दर ८२९.५ रुपयांवर गेले आहेत.

वाचा:  ‘डिपॉझिट जप्त केलंय, कशाला बोलायचं’; पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेअंतर्गत गेल्या काही वर्षात ८ कोटी गॅस सिलिंडरचे वाटप केले आहे. महिलांची चूलीच्या धूरापासून मुक्तता व्हावी यासाठी या योजनेलाही सरकारने प्राधान्य दिले होते. विनासबसिडीच्या गॅस सिलिंडर दराचा विचार करता, दिल्‍लीमधील गॅस सिलिंडरचे दर ७१४ रुपयांच्या तुलनेत १४४.५ रुपयांनी वाढून ८५८.५ रुपयांवर गेले आहेत. मुंबईतील गॅस सिलिंडरचे दर ६८४.५ रुपयांच्या तुलनेत ८२९.५ रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथील दर ७४७ रुपयांच्या तुलनेत ८९६ रुपयांवर गेले आहेत. तर चेन्नई येथील दर ७३४ रुपयांच्या तुलनेत ८३१ रुपयांवर गेले आहेत. 

वाचा:  सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून दखल; पोलिसांना कारवाईचे आदेश

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App