वावर आहे तर पॉवर आहे; ४१ दिवसांत कोथिंबिरीतून १२ लाख ५१ हजारांचे उत्पन्न

Smiley face < 1 min

नाशिक – सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील शेतकऱ्याला ४ एकरातील कोथिंबिरीच्या पिकातून तब्बल १२ लाख ५१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. केवळ ४१ दिवसांत घेतलेल्या कोथिंबिरीला मिळालेल्या विक्रमी भावामुळे हा शेतकरी लखपती झाला आहे. त्यामुळे ”वावर आहे तर पॉवर आहे”, अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यावर आस्मानी आणि सुल्तानी संकट येत आहेत. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. त्यातूनही चांगले पीक झालेच तर त्याला योग्य तो भाव मिळत नाही. मात्र, संकटातही संधीचे सोनं करता येते. हे दाखवून दिले आहे, नाशिकच्या विनायक हेमाडे या शेतकऱ्याने.

वाचा:  पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा – अजित पवार

सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील विनायक हेमाडे या शेतकऱ्याने कोथिंबिरीच्या पिकातून तब्बल साडेबारा लाखाचे उत्पन्न घेतले आहे. या शेतकऱ्याने ४ एकर शेतात ४५ किलो कोथिंबिरीच्या बियाणांची लागवड केली होती. ४१ दिवस पिकाच्या वाढीसाठी चांगली मेहनत या शेतकऱ्याने घेतली. दापूर येथील व्यापारी शिवाजी दराडे यांनी हेमाडे यांना कोथिंबिरीची मागणी केली. तेव्हा या कोथिंबिरीचा हा व्यवहार १२ लाख ५१ हजार रुपयांना झाला.

वाचा:  ‘आशा वर्कर्सच्या मागण्या मान्य केल्या जातील’

दरम्यान, कोथिंबिरीतून मिळालेल्या भरघोस उत्पन्नामुळे परिसरात हा शेतकरी चर्चेचा विषय आहे. हेमाडे यांनी आपल्या हिमतीवर बाजारभावाची अपेक्षा न करता कोथिंबीरीची लागवड केली होती. या शेतकऱ्याला कोशिंबिरीतून भरघोस उत्पादन मिळाल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App