शाळा कधी सुरु होणार ? संभ्रम कायम !

Smiley face < 1 min

ई ग्राम : जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा 15 जूनला सुरू करायच्या की एक जुलैला, याबाबत राज्य सरकारने अद्याप ठोस निर्णय घेतलेला नाही. शाळा सुरू करण्यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समित्यांकडून शिक्षण विभागाने अभिप्राय मागविले आहेत. हे सुरू असताना दुसरीकडे, मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया गेले तरी चालेल; पण त्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्धार काही पालकांनी केला आहे. त्यामुळे पालकांसह शिक्षण विभाग व शालेय व्यवस्थापन समितीपुढे संभ्रम निर्माण झाला आहे.

शैक्षणिक वर्ष दर वर्षी 15 जूनपासून सुरू होते. मात्र, यंदा कोरोना संकटामुळे सगळेच गणित बिघडले आहे. या वर्षीचे शैक्षणिक वर्ष 15 जूनला सुरू होते की एक जुलैला, की त्यानंतर सुरू होणार, हे अद्याप राज्य सरकारने जाहीर केलेले नाही. त्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे राज्य सरकारने शाळा सुरू करायची घाई करू नये, असे मत पालक व्यक्त करीत आहेत.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामाईक अंतर राखणे जमणार नाही. त्यामुळे पालकांना नेहमी काळजी लागेल. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत जसे अध्यापन केले जाते, तसेच अध्यापन सोशल माध्यमांचा वापर करून करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे. दुसरीकडे, कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या भागात 15 जूनलाच शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागही संभ्रमात आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App