सावकाराच्या त्रासामुळे ऊसतोड कामगाराने संपवले जीवन

Smiley face < 1 min

म्हसवड : दुष्काळी तालुक्यात सापडलेल्या गोरगरिबांना लुटून सावकारी पैशावर भल्लेमोठे झालेले  खाजगी सावकार पठाणी पद्धतीने वसुली करून दहशत करत आहेत. गेल्या महिन्यात खासगी सावकाराच्या दहशतीने एका ऊसतोड कामगाराने आपले जीवन संपवल्याची चर्चा माण तालुक्यात दबक्या आवाजात सुरू आहे. या प्रकरणाचा भांडाफोड करण्याची मागणी होत आहे. तसेच खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून अनेक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सावकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.  

वाचा:  या देशात वाढले सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र !

माण तालुक्यातील ऊसतोडणी कामगाराने खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. गेल्याच महिन्यांत तालुक्यातील एका गावात ऊसतोड कामगाराने सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीवनाचा शेवट केला. त्याने एका सावकाराकडून काही रक्‍कम उचलली होती. घेतलेली रक्कम योग्य वेळी न परत करता आल्यामुळे  या रक्कमेचा आकडा वाढत गेला. त्यामुळे संबंधीत कामगार या सावकारी कर्जात दबत गेला. सावकार पैशांसाठी त्याला नको नकोसे करत होता. त्यामुळे जगणे नकोसे झाल्यामुळे आत्महत्या करण्याचा मार्ग निवडला.

वाचा:  ‘डिपॉझिट जप्त केलंय, कशाला बोलायचं’; पडळकरांच्या वक्तव्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

माण तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य माणूस अनेक वर्षापासून दुष्काळाच्या छायेत जीवन कवडीमोलाने जगत आहे. दुष्काळाची स्थिती असल्यामुळे सामान्य माणसांचे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यात अशा परिस्थित खाजगी सावकारांनी आजून जगणे मुश्किल केले आहे. त्यामुळे बहुतांश लोकांच्या आर्थिक नाडया थंड झाल्या आहेत. बॅका, पतसंस्था आणि फायनान्स कंपन्यांचे व्यवहार किचकट झाले आहेत.

वाचा:  सोयाबीन न उगवल्याची खंडपीठाकडून दखल; पोलिसांना कारवाईचे आदेश

खाजगी सावकारी, प्लॉटिंग, वाळुमाफिया, मटकाकिंग यांची पिलावळ गावागावात वाढत चालली आहे. गाव तिथं सावकार ही संकल्पना अगोदरपासून रूजली आहे. दुसरीकडे दोन नंबर धंदे करून भल्लेमोठे झालेले खाजगी सावकार सावकारीचा धंदा करू लागले आहेत. दहशत करून अक्षरश: लुटत आहेत. लाखो रूपयांचे कर्ज वाटप करून पठाणी व्याजदराने पैसा उकळणारे खाजगी सावकार तालुक्यात धिंगाणा घालत आहेत. कर्जरूपात पैसे देऊन ज्यादा व्याजदराने वसूल केले जात आहेत.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App