हवामान बदलानूसार कडधान्य वाण निर्मितीची गरज

Smiley face < 1 min

ई ग्राम :  भविष्याचा विचार करता कडधान्य पिकाच्या नविन वाणाची वाढत्या जैविक, अजैविक ताणात टिकुन राहुन उत्पाकतेमध्ये वाढ कशी होईल याचा आभ्यास करणे गरजेचे आहे. जास्त  कालावधी,  जास्त लागणारे पाणी यामुळे कडधान्य पिकांचे वाण भविष्यात निष्फळ ठरणार आहे. जगात कडधान्यांचा सर्वात मोठा उत्पादक, ग्राहक आणि आयातदार अशी भारताची ओळख आहे.

कडधान्य ही प्रथिनेयुक्त समृध्द असतात. १०० ग्रॅम कडधान्यामध्ये १७ ते २५ टक्क्यांपर्यंत प्रथिने असतात. याला अपवाद म्हणजे सोयाबीन यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४०-४२ टक्के असते. शाकाहारी आहारामध्ये प्रथिनांची पुर्तता प्रामुख्याने कडधान्यातूनच होते. प्रथिना व्यतिरिक्त कडधान्यामध्ये बी जीवनसत्वे, खनिजे आणि मेद भरपूर प्रमाणात असतात.

वाचा:  पूरस्थितीची महाराष्ट्र, कर्नाटकातील मंत्र्यांकडून पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ आदेश

तुर
हे पीक खरीप हंगामातील महत्वाचे कडधान्यवर्गीय पीक असून महाराष्ट्रात राज्यक्षेत्र आणि उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. परंतु हे पीक पाऊसमान चांगला व समप्रमाणात पडला तरच शक्य आहे. अन्यथा सन २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१८-१९ सारखी परिस्थिती राहिल्यास उत्पादनामध्ये फार मोठी घट होते. याचाच अर्थ तुरीमध्ये पाण्याचा ताण सहन करणारे वाण निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच हे वाण मर आणि वांझ या महत्वाच्या रोगांना प्रतिकारक मध्यम प्रतिकारक असणे गरजेचे आहे. तुरीमध्ये सर्वात महत्वाची किड म्हणजे शेंगा पोखरणारी अळी किंवा मरुका किड या किडीमुळे साधारणपणे ३५ ते ४० टक्के नुकसान होते. तुरीचे खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढवायचे असेल तर अधिक उत्पादनक्षम संकरित वाण निर्माण करणे गरजेचे आहे. सध्याचे संकरित वाण हे सुधारित वाणापेक्षा कमी उत्पादन देतात.

वाचा:  शेतकऱ्यांनो ‘या’ ५ जोडधंद्यातून कमवा लाखोंचे उत्पन्न

मुग व उडीद
ही दोन्ही कडधान्य पीके कमी दिवसात पक्व होतात. पावसाच्या पाण्यावर खरीपात येणारी पिके आहेत. परंतु पाऊस जर उशिरा सुरु झाला तर पर्यायाने दोन्ही पिकांची पेरणी उशीरा होते.  यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. दिवसेंदिवस या दोन्ही पिकांचे क्षेत्र कमी होत असल्याचे दिसुन येत आहे. त्यासाठी उशिरा पेरणीसाठी उपयुक्त असे वाण निर्माण करणे गरजेचे आहे.

वाचा:  काजू उद्योगाला अजित पवारांचा मोठा दिलासा; घेतला मोठा निर्णय

मुगामध्ये भूरी व पिवळा विषाणू या रोगास प्रतिकारक असणे. शेंगा एकाच वेळेस पक्व  होणे. तसेच यांत्रिक पद्धतीने काढण्यास उपयुक्त असे वाण निर्माण करण्याची गरज आहे. रब्बी लागवडीसाठी उपयुक्त वाण निर्माण करणे गरजेचे आहे.

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App