राज्यात १० दिवसांचा कडक लॉकडाऊन?; मंत्रिमंडळाच्या बैठकीत हालचाली

Smiley face < 1 min

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे, या बैठकीत पुढील १० दिवस कडक लॉकडाऊन लागू केला जाण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्येचा आकडा दिवसेंदिवस वाढता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात सक्तीचा दहा दिवसाचा लॉकडाऊन लागू करण्यावर चर्चा करण्यात येत आहे.

egram
वाचा:  ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही – सुप्रीम कोर्ट

दरम्यान, राज्यात लॉकडाऊन जाहीर केल्यास कोरोना रुग्णसंख्या रोखता येणं शक्य होईल. तसेच लोकांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचीही जाणीव होईल. शिवाय मुंबई, पुण्यासारख्या शहरात होणाऱ्या नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण आणलं जाणार असल्याचंही या बैठकीत मांडण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

egram

आजच ई-ग्राम ॲप्लिकेशन प्ले- स्टोअर वरून डाउनलोड करा, डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा. Download App